घरक्रीडाराजस्थानचा पुन्हा पराभव; ४ गडी राखत चेन्नई विजयी

राजस्थानचा पुन्हा पराभव; ४ गडी राखत चेन्नई विजयी

Subscribe

चेन्नई ४ गडी राखत राजस्थानवर मात केली. हा सामना अत्यंत अटीतटीचा आणि रोमांचक ठरला.

राजस्थान आणि चेन्नई यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात अखेर चेन्नईला यश मिळाले. चेन्नईने आपले ४ गडी राखत राजस्थानवर मात केली. महेंद्रसिंह धोनी आणि अंबाजी रायडू यांनी केलेल्या अर्धशतकाच्या भागीदारीमुळे चेन्नईला १५२ धावांचे आव्हान गाठता आले. अखेरच्या षटकात धोनी आणि रायडू बाद झाल्यामुळे चेन्नईपुढे मोठे आव्हान निर्माण झाले. परंतु, अखेर हा डाव चेन्नईने जिंकला.

राजस्थान आणि चेन्नई यांच्यात आयपीएलच्या १२ मोसमातील २५ वा सामना खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने २० षटकांत ७ बाद १५१ धावा केल्या. त्यामुळे चेन्नईपुढे १५२ धावांचे आव्हान आहे. दरम्यान हे आव्हान पेलताना चेन्नईची सुरुवात फार वाईट झाली आहे. अवघ्या २५ धावांवर चेन्नईचे चार गडी माघारी गेले.

- Advertisement -

राजस्थान रॉयल आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएलच्या १२ मोसमातील दुसरा सामना खेळला गेला. हा सामना जिंकणे राजस्थानसाठी फार महत्त्वाचे होते. राजस्थानच्या घरच्या मैदानावर अर्थात सवाई मानसिंग स्टेडिअमवर हा सामना खेळला गेला. चेन्नईने या मोसमात गेल्या ७ सामन्यांपैकी ६ सामन्यांमध्ये यश मिळवले आहे. तर राजस्थानने गेल्या ६ सामन्यांमध्ये फक्त १ सामन्यात यश मिळवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -