घरक्रीडाशेवटचा षटकार मारत राजस्थानने ऐटीत सामना जिंकला

शेवटचा षटकार मारत राजस्थानने ऐटीत सामना जिंकला

Subscribe

राजस्थानने नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. तो निर्णय योग्य ठरून राजस्थाचा दणदणीत विजय झाला.

राॅयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल यांच्यात आज दनकेबाज सामना झाला. या सामन्यात राजस्थानने आपले ७ गडी राखून बंगळुरूचा पराभव केला. या विजयासोबतच राजस्थानने आयपीएलच्या १२ व्या मोसमामध्ये आपले खाते खोलले आहे. हा सामना राजस्थानच्या जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर येथे खेळला गेला. राजस्थान आणि बंगळुरु या दोन्ही संघांना आयपीएलच्या १२ व्या मोसमामध्ये आपलं खातं उघळता आलेलं नव्हते. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता. दरम्यान, आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकूण राजस्थानने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

बंगळुरुचे चार गडी तंबूत

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहलीने आणि पार्थिव पटेलने चांगली सुरुवात करुन दिली. परंतु, अखेर राजस्थानच्या श्रेयस गोपालने विराटचा त्रिफळा उडवला. विराटने २५ चेंडूत २३ धावा केल्या. त्यानंतर गोपालने पुन्हा एबी डीव्हिलियर्सला स्वत:च्या गोलंदाजीवर अप्रतिम झेल टिपत बाद केलं. डीव्हिलियर्सने ९ चेंढूत १३ धावा केल्या. त्यापाठोपाठ हेटमायरही झेलबाद झाला. यानंतर ४१ चेंडूत ६७ धावा करुन पार्थिव पटेल बाद झाला. दरम्यान, २० षटकांत बंगळुरुने ४ बाद १५८ धावा केले. यामध्ये मार्कस स्टॉयनीसने नाबाद ३१ धावा केले तर मोईन अलीने नाबाद १८ धावा केले.

- Advertisement -

राजस्थानची दमदार सुरुवात

दरवेळप्रमाणे राजस्थानची आजच्या समान्यातही दमदार सुरुवात झाली. या सामन्यात अजिंक्य रहाणे २२ धावांवर बाद झाला. अजिंक्यने २० चेंडूत २२ धावा केले. बंगळुरुच्या युझी चहलने त्याची विकेट घेतली. परंतु, तरीही राजस्थानच्या फलंदाजांना आवरतं बंगळुरुला कठीण होऊन बसलं. जोसेफ बटलरने अर्धशतक केले. ४३ चेंडूत ५९ धावा केल्यानंतर तो बाद झाला. त्यानंतर फटकेबाजीच्या प्रयत्नात स्टीव्ह स्मीथ बाद झाला. त्याने ३१ चेंडूत ३४ धावा केले. त्यानंतर राहुल त्रिपाठीने २३ चेंडूत ३४ धावा करत विजयाचा झेंडा फडकवला. राहुलने षटकार मारून सामना जिंकला.

दोन्ही संघामध्ये ‘हे’ आहेत बदल

आज राजस्थानच्या संघात दोन बदल करण्यात आले होते. स्टुअर्ट बिन्नी आणि वरुण एॅरॉन यांना आज संधी देण्यात आली. यासोबतच बंगळुरुच्या संघात मार्कस स्टॉयनीस, नवदीप सैनी आणि अक्षदीप नाथ यांनादेखील संधा दिली गेली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -