IPL 2020: तब्बल २० हजार कोरोना चाचण्या होणार, १० कोटींचा खर्च अपेक्षित

IPL 2020 20,000 corona tests will be done, expected to cost 10 crores

कोरोनाच्या धर्तीवर खेळवल्या जाणाऱ्या आयपीएलसाठी बीसीसीआय तब्बल २० हजार कोरोना चाचण्या करणार आहे. यासाठी सुमारे १० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, भारतात करण्यात आलेल्या चाचण्यांचा खर्च फ्रँचायझींनी उचलला. त्यामुळे आता होणारा खर्च बीसीसीआय उचलणार आहे. २० ऑगस्ट पासून संघ यूएईमध्ये जायला लागले. त्यानंतर बीसीसीआयने संघातील सदस्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यास सुरवात केली.

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, युएईच्या कंपनीची चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे. तेथे किती चाचण्या करण्यात येतील हे मी सांगू शकत नाही, परंतु २०,००० पेक्षा जास्त चाचण्या करण्यात येतील. प्रत्येक चाचणीसाठी २०० दिरहॅम (३९७० रुपये) खर्च येईल. यामुळे बीसीसीआय सुमारे १० कोटी खर्च करणार आहे. कंपनीच्या ७५ आरोग्यसेवा कर्मचारी आयपीएलमधील चाचणी प्रक्रियेचा एक भाग आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने युएईमध्ये आयपीएलचा १३ वा हंगाम खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी काळजी घ्यावयाची आहे त्यासाठी बीसीसीआयने प्रत्येक संघाला मार्गदर्शकतत्वे आखून दिली आहेत. प्रत्येक सामन्यानंतर सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे तब्ब्ल २० हजाराहून अधिक कोरोना चाचण्या होणार आहेत.