घरIPL 2020MI vs KXIP : रोहित शर्मा, पोलार्डची फटकेबाजी; मुंबईचा पंजाबवर ४८ धावांनी...

MI vs KXIP : रोहित शर्मा, पोलार्डची फटकेबाजी; मुंबईचा पंजाबवर ४८ धावांनी विजय

Subscribe

मुंबई इंडियन्सने पंजाबला ४८ धावांनी पराभूत करत या मोसमातील दुसरा विजय मिळवला आहे. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना पंजाबला १९२ धावांचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाने २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात केवळ १४३ धावाच केल्या.

मुंबईच्या १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची खराब सुरूवात झाली. सलामीवीर मयंक अग्रवालच्या रुपात पंजाबला पहिला धक्का बसला. मयंक २५ धावा करुन माघारी परतला. मयंक पाठोपाठ करूण नायरला भोपळा देखील फोडता आला नाही. चांगल्या फॉर्मात असलेला पंजबचा कर्णधार लोकेश राहुल मुंबईचा फिरकीपटू राहुल चहरच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. केएल राहुलने १७ धावा केल्या. पंजाबचे ३ गडी झटपट बाद झाल्यानंतर निकोलस पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पूरन आणि मॅक्सवेल यांची जोडी पॅटिन्सनने फोडली. पूरन २७ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ४४ धावा करत बाद झाला. त्यानंतर मॅक्सवेलही मोठा फटका मारताना ११ धावांवर माघारी परतला.

- Advertisement -

पंजाबविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकात १९१ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने अत्यंत संयमी खेळी करत ७० धावांची खेळी केली. शेवटच्या षटकांमध्ये पांड्या आणि पोलार्डने पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पोलार्डने २० चेंडूत नाबाद ४७ धावा कुटल्या. तर हार्दिकने ११ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या. मुंबईने रोहित शर्मा, पोलार्ड, हार्दिक-कृणाल पांड्याच्या जोरावर पंजाबला १९२ धावांचे आव्हान दिलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -