घरIPL 2020पाठीवर फोड आलेले नाहीत, ही आहे मॅच जिंकण्याची थेरपी

पाठीवर फोड आलेले नाहीत, ही आहे मॅच जिंकण्याची थेरपी

Subscribe

IPL स्पर्धा गाजवण्यासाठी भारताच्या वेगवान गोलंदाजाने कपिंग थेरपी घेतली आहे. भारताचा आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी फिटनेसबाबत बराच जागरूक आहे. तो बर्‍याचदा आपल्या वर्कआउटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. अलीकडेच शमीने त्याच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर कपिंग थेरपी सेशनचे फोटो शेअर केले आहेत. शमीने दुबईमध्ये ही थेरपी घेतली आहे.

“कपिंग थेरपीनंतर केल्यावर मला खूप आराम वाटतो?” असं शमीने फोटो शेअर करताना म्हटलं आहे. कपिंग थेरपी सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय आहे. मायकल फेल्प्स, नेमार, अँथनी जोशुआ, किम कादार्शिअन यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी ही थेरपी घेतली आहे.

 

View this post on Instagram

 

- Advertisement -

After cupping feeling so Relax 👁🧐? . #saddapunjab #mshami11 #dubai🇦🇪 #india #cuppingtherapy #fittness

A post shared by Mohammad Shami , محمد الشامي (@mdshami.11) on

- Advertisement -

कपिंग थेरपी म्हणजे काय?

कपिंग थेरपी क्रीडापटू आणि मनोरंजन जगतातील प्रसिद्ध व्यक्तींमध्ये खूप लोकप्रिय आहे. कपिंग थेरपी ही एक चिनी थेरपी आहे, ज्यामध्ये कप शरीरावर ठेवून व्हॅक्यूम तयार केला जातो. सक्शनसोबत ब्लड सर्क्युलेशनच्या माध्यमातून या थेरपीपासून अनेक प्रकारचे उपचार केले जातात. कपिंग थेरपी सुरुवात चीनमध्ये सुमारे २००० वर्षांपूर्वी सुरू झाली. ही पारंपारिक आणि प्राचीन वैद्यकीय प्रथा आहे. कपिंगला अरबी संस्कृतीत हिजामा म्हणून ओळखलं जातं. या थेरपीमध्ये कप हे काच, बांबू, माती आणि सिलिकॉन पासून बनवले जातात. कपिंग थेरपी ड्राय, वेट आणि फायर या ३ पद्धतीने केली जाते.

कपिंग थेरपीचे फायदे

कपिंग थेरपीमुळे वयावृद्ध दिसता येत नाही, रक्ताभिसरण नीट होते, शरीर दुखत असेल तर आराम मिळतो, शरिरातल्या विषारी गोष्टी काढल्या जातात, त्वचा सुंदर होते. याशिवाय, कंबर दुखी, स्लिप डिस्क, पायाची सूज या त्रासांसाठी कपिंग थेरपी फायद्याची असल्याचं सांगितलं जातं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -