Eco friendly bappa Competition
घर क्रीडा ‘हिटमॅन’चा दुसऱ्याच सामन्यात विक्रम; ठोकलं द्विशतक

‘हिटमॅन’चा दुसऱ्याच सामन्यात विक्रम; ठोकलं द्विशतक

Subscribe

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना सुरू असून या सामन्यात रोहित शर्माने विक्रम केला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये षटकारांचा नवा विक्रम नोंदविला आहे. आयपीएलच्या इतिहासात २०० किंवा त्याहून अधिक षटकार ठोकणार्‍या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा सामील झाला आहे. रोहित शर्माने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अर्धशतक पूर्ण केल्यानंतर आक्रमक खेळी करताना दिसला.

रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात द्विशतक ठोकणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने केकेआरविरूद्ध ही कमाल केली आहे. यासह त्याने अनेक विक्रमही केले आहेत. रोहित शर्माने १४ व्या षटकात कुलदीप यादवच्या चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत हिटमॅन रोहित शर्माने आयपीएल कारकिर्दीत २०० षटकार पूर्ण केले. रोहित शर्माने ४७ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८० धावा केल्या आहेत.

- Advertisement -

आयपीएलच्या कारकिर्दीत २०० षटकार लगावणारा रोहित चौथा खेळाडू ठरला. या यादीत सर्वाधिक ३२६ षटकारांसह ख्रिस गेल अव्वल, २१४ षटकारांसह डीव्हिलियर्स दुसरा तर २१२ षटकारांसह धोनी तिसरा आहे. त्यापाठोपाठ आज रोहितने २०० षटकारांचा टप्पा गाठला.

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -