घरIPL 2020RR vs KXIP : तेवातियाचे ५ चेंडूत ५ षटकार, पूरनचं अद्भुत क्षेत्ररक्षण;...

RR vs KXIP : तेवातियाचे ५ चेंडूत ५ षटकार, पूरनचं अद्भुत क्षेत्ररक्षण; पाहा व्हिडीओ

Subscribe

शारजाच्या मैदानात पंजाबविरुद्ध रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत मैदानात तळ ठोकत संघाला थरारक विजय मिळवून दिला. पंजाबच्या २२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. मात्र, संजू सॅमसन आणि स्टिव्ह स्मिथ यांनी महत्वपूर्ण भागीदारी संघाला सावरलं. या सामन्याचा खरा हिरो ठरला तो अष्टपैलू राहुल तेवातिया.

ऐन क्षणी सॅमसन बाद झाल्यानंतर तेवातियाने एक बाजू लावून धरली. शेल्डन कोट्रेलच्या १८ व्या षटकात तेवतियाने ५ षटकार खेचले आणि सामन्याचं चित्रच पालटलून टाकलं. तेवतियाच्या फटकेबाजीमुळे पिछाडीवर पडलेलं राजस्थान एकदम आघाडीवर आलं. आयपीएलमध्ये एकाच षटकात पाच षटकार ठोकण्याच्या ख्रिस गेलच्या विक्रमाशी तेवतियाने बरोबरी केली.

- Advertisement -

पूरनने हवेत झेप घेत सीमारेषेबाहेरून अडवला सिक्सर

संजू सॅमसनने फटकावलेल्या चेंडू पूरनने सीमेलगत हवेत झेप घेत षटकार अडवला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -