घरIPL 2020नाव मोठं लक्षण खोटं; मालकाला बुडवणारे हे आहेत IPL मधील फ्लॉप खेळाडू

नाव मोठं लक्षण खोटं; मालकाला बुडवणारे हे आहेत IPL मधील फ्लॉप खेळाडू

Subscribe

आयपीएलचा तेरावा हंगाम हा अर्ध्यावर येऊन पोहोचला आहे. तेराव्या हंगामात काही खेळाडूंनी आत्तापर्यंत चमकदार कामगिरी करून सर्वांना प्रभावित केलं आहे, परंतु असे काही खेळाडू आहेत ज्यांना भारी किंमत मोजूनही त्यांना छाप पाडता आलेली नाही. याचा फटका त्या संघाला बसला आहे. असे कोण खेळाडू आहे जे मोठी किंमत मोजून देखील चांगली कामगिरी करता आलेली नाही. ते जाणून घेऊया.

पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला KKR ने १५.५ कोटींना विकत घेतलं. यापूर्वी कमिन्स २०१४ मध्ये केकेआरकडूनही खेळला आहे. त्याने आत्तापर्यंत नऊ सामने खेळले आहेत आणि ८.४२ च्या सरासरीने केवळ तीन विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, त्याने फलंदाजी करताना १२६ धावा केल्या आहेत.

- Advertisement -

ग्लेन मॅक्सवेल

ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला किंग्ज इलेव्हन पंजाबने १०.७५ कोटींमध्ये विकत घेतलं. मॅक्सवेलने आतापर्यंत नऊ सामन्यांमध्ये एकही षटकार ठोकलेला नाही. त्याने आतापर्यंत फक्त ५८ धावा केल्या आहेत. गोलंदाजी करताना आतापर्यंत त्याला फक्त एक विकेट मिळाला आहे.

शेल्डन कॉटरेल

शेल्डन कॉटरेलला चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर त्याला आयपीएलमध्ये स्थान मिळालं आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने ८.५ कोटींमध्ये विकत घेतला आहे. मात्र, कॉटरेलने पार निराशा केली असून आता प्रयंत त्याने सहा विकेट्स घेतले आहेत. त्याने या मोसमातील सर्वात महागडं षटकही टाकलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बिस्किट चाखण्यासाठी कंपनी देतेय ४० लाख रुपये पगार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -