Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : एबी डिव्हिलियर्सची दमदार कामगिरी; गेल, वॉटसनला सोडले मागे

IPL 2021 : एबी डिव्हिलियर्सची दमदार कामगिरी; गेल, वॉटसनला सोडले मागे

एबीने दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करताना ४२ चेंडूत नाबाद ७५ धावांची मॅचविनिंग खेळी केली.

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात बंगळुरूचा यष्टीरक्षक-फलंदाज एबी डिव्हिलियर्सने दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करताना ४२ चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद ७५ धावांची मॅचविनिंग खेळी केली. या खेळीदरम्यान एबीने आयपीएलमध्ये पाच हजार धावांचा टप्पा पार केला. ही कामगिरी करणारा तो आयपीएलच्या इतिहासातील केवळ दुसरा परदेशी खेळाडू ठरला. एबीने आतापर्यंत १६१ डावांत ५०५३ धावा केल्या असून यात तीन शतके आणि ४० अर्धशतकांचा समावेश आहे.

वॉर्नरनंतर दुसरा परदेशी खेळाडू 

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या परदेशी खेळाडूंमध्ये डेविड वॉर्नर अव्वल स्थानी आहे. वॉर्नरने (चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी) आतापर्यंत १४७ डावांत ५३९० धावा केल्या आहेत. त्यामुळे वॉर्नरनंतर आयपीएलमध्ये पाच हजार धावांचा टप्पा पार करणारा एबी केवळ दुसरा परदेशी खेळाडू ठरला. भारतीयांमध्ये विराट कोहली (६०४१ धावा), सुरेश रैना (५४७२), शिखर धवन (५४६२) आणि रोहित शर्मा (५४३१) यांना पाच हजारहून अधिक धावा करण्यात यश आले आहे.

गेल तिसऱ्या स्थानी

- Advertisement -

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या परदेशी खेळाडूंमध्ये वॉर्नर पहिल्या आणि एबी दुसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज क्रिस गेल या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. यंदा पंजाब किंग्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गेलने आतापर्यंत १३७ डावांत ६ शतके आणि ३१ अर्धशतकांच्या मदतीने ४८९१ धावा फटकावल्या आहेत. १४१ डावांत ३८७४ धावा करणारा शेन वॉटसन चौथ्या स्थानी आहे.

- Advertisement -