घरक्रीडाIPL 2021 : उर्वरित आयपीएलमध्ये खेळण्यास ऑस्ट्रेलियन खेळाडूंना 'हिरवा कंदील'!

IPL 2021 : उर्वरित आयपीएलमध्ये खेळण्यास ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ‘हिरवा कंदील’!

Subscribe

आयपीएलचा उर्वरित मोसम १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या क्रिकेटपटूंना इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) उर्वरित मोसमात खेळण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याची क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तयारी दर्शवली आहे. कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव झाल्याने यंदाचा आयपीएल मोसम मे महिन्यात अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. परंतु, आयपीएलचा उर्वरित मोसम १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेनंतर दोन दिवसांत टी-२० वर्ल्डकपला सुरुवात होणार असून या दोन्ही स्पर्धा युएईमध्येच खेळल्या जाणार आहेत.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून परवानगी 

टी-२० वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार होती. परंतु, ही मालिका पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) केली. तसेच ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० तिरंगी मालिकेसाठी अजून ठिकाण निश्चित झालेले नाही. याच पार्श्वभूमीवर, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या खेळाडूंना आयपीएलच्या उर्वरित मोसमात खेळण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

स्थानिक क्रिकेटऐवजी आयपीएल खेळणार 

डेविड वॉर्नर (हैदराबाद), ग्लेन मॅक्सवेल (बंगळुरू), स्टिव्ह स्मिथ (दिल्ली), मार्कस स्टोईनिस (दिल्ली) आणि जाय रिचर्डसन (पंजाब) यांसारखे आघाडीचे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आयपीएलच्या उर्वरित मोसमात खेळू शकणार आहेत. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स मात्र आयपीएलला मुकणार असून थेट टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळणार आहे. ऑस्ट्रेलियातील स्थानिक मोसमाला ११ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. परंतु, सलग दुसऱ्या वर्षी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्थानिक स्पर्धांत खेळण्याऐवजी आयपीएलमध्ये सहभागी होतील. त्यामुळे आयपीएल संघांना मोठा दिलासा मिळाला आहे.


हेही वाचा – अफगाणिस्तान संघाच्या अधिकाऱ्याचे टी-२० वर्ल्डकपबाबत मोठे विधान

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -