Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा IPL 2021 : काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करता आल्या असत्या! कमिन्सचा बीसीसीआयला...

IPL 2021 : काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करता आल्या असत्या! कमिन्सचा बीसीसीआयला टोला

बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने मिळून मंगळवारी ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

Related Story

- Advertisement -

कोरोनाने बायो-बबलमध्ये शिरकाव केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) आयपीएलचा यंदाचा मोसम स्थगित करणे भाग पडले. भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी आयपीएल स्पर्धा बायो-बबलमध्ये सुरक्षितरित्या पार पडू शकेल असा बीसीसीआयला विश्वास होता. परंतु, मागील दोन-तीन दिवसांत काही खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि ग्राऊंड स्टाफच्या सदस्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने मिळून मंगळवारी ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयला यंदा आयपीएलचे आयोजन करताना काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करता आल्या असत्या, असे कोलकाता नाईट रायडर्सचा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला वाटते.

अधिक धोका पत्करला

मागील वर्षी आयपीएल स्पर्धा युएईमध्ये यशस्वीरीत्या पार पडली. त्या स्पर्धेच्या आयोजनात कोणत्याही चुका झाल्या नाहीत. यंदा मात्र आयोजकांनी एक पाऊल पुढे जात थोडा अधिक धोका पत्करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भारतातील विविध शहरांत आयपीएलचे सामने खेळवले. आयोजकांना काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करता आल्या असत्या, असे मागे वळून पाहताना नक्कीच वाटते. बीसीसीआयने यंदा आयपीएलच्या आयोजनात अधिक काळजी घेणे गरजेचे होते, असे कमिन्सने सांगितले.

…म्हणून स्पर्धेत खेळण्याचा निर्णय

- Advertisement -

मंगळवारी आयपीएलचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. परंतु, कमिन्सने त्याआधीच हे विधान केले होते. भारतामध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्याने यंदा आयपीएलच्या आयोजनावरून बीसीसीआयवर बरीच टीकाही झाली. याबाबत कमिन्स म्हणाला, आयपीएलमध्ये खेळणे सुरक्षित आहे का? हे मी सर्वात आधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आयपीएल न झाल्यास आमचे या काळात मनोरंजन कसे होणार? असा प्रश्न मला काही जणांनी विचारला. त्यामुळे मी या स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. भारताने मला खूप काही दिले आहे आणि त्याची परतफेड करण्याचा हा माझा प्रयत्न होता.

- Advertisement -