घरक्रीडाIPL 2021 : आयपीएल स्थगित, रद्द नाही; गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षांनी केले स्पष्ट ...

IPL 2021 : आयपीएल स्थगित, रद्द नाही; गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षांनी केले स्पष्ट   

Subscribe

स्पर्धा रद्द झालेली नसून आम्ही विविध पर्यायांचा विचार करत असल्याचे ब्रिजेश पटेल यांनी सांगितले.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेला आहे, रद्द केलेला नाही, असे आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी स्पष्ट केले. मागील दोन-तीन दिवसांत काही खेळाडू, सपोर्ट स्टाफ सदस्य आणि ग्राऊंड स्टाफच्या सदस्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करणे भाग पडले. परंतु, ही स्पर्धा रद्द झालेली नसून आम्ही विविध पर्यायांचा विचार करत असल्याचे ब्रिजेश पटेल यांनी सांगितले.

काही खेळाडूंना सुरक्षित वाटत नव्हते

आयपीएलचा उर्वरित मोसम कुठे आणि कधी घेता येईल यासाठी आम्ही विविध पर्यायांचा विचार करत आहोत. कोरोनाने एकूण चार संघांच्या बायो-बबलमध्ये शिरकाव केला होता. त्यानंतर ठरल्याप्रमाणे या स्पर्धेचे सामने घेत राहणे शक्य नव्हते. त्यातच सध्याच्या परिस्थितीत काही खेळाडूंना सुरक्षित वाटत नव्हते. त्यामुळे आम्ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला, असे पटेल म्हणाले. तसेच स्पर्धा पुन्हा सुरु करण्यासाठी आम्ही लवकरच नव्या तारखा ठरवू असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

लवकरच नव्या तारखा ठरवू

देशात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे आयपीएलला पुन्हा कधी सुरुवात होणार हे आताच सांगणे अवघड आहे. आम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वेळापत्रकाचाही विचार करावा लागेल. टी-२० वर्ल्डकपच्या आधी किंवा नंतर, उर्वरित सामने खेळवण्यासाठी कधी वेळ आहे, हे आम्हाला पाहावे लागेल. परंतु, आम्ही लवकरच नव्या तारखा ठरवू, असे पटेल म्हणाले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -