घरक्रीडाIPL 2021 : यंदाचा मोसम स्थगित होण्याची ‘ही’ कारणे! मागील दोन दिवसांतील...

IPL 2021 : यंदाचा मोसम स्थगित होण्याची ‘ही’ कारणे! मागील दोन दिवसांतील घडामोडी 

Subscribe

खेळाडू आणि या स्पर्धेची जोडल्या गेलेल्या व्यक्तींची सुरक्षितता लक्षात घेऊन अखेर ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतण्यात आला.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी-२० स्पर्धा मानली जाते. त्यामुळे भारतात कोरोनाचा कहर असतानाही बीसीसीआयने या स्पर्धेचा घाट घातला. त्यांनी ही स्पर्धा बायो-बबलमध्ये घेतली. बीसीसीआय, तसेच आठही संघांनी मिळून योग्य ती खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांनंतरही कोरोनाने बायो-बबलमध्ये शिरकाव केला. त्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला तातडीने बैठक बोलवावी लागली. खेळाडू आणि या स्पर्धेची जोडल्या गेलेल्या व्यक्तींची सुरक्षितता लक्षात घेऊन अखेर ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतण्यात आला. मागील दोन दिवसांत घडलेल्या घटनांमुळे बीसीसीआय आणि गव्हर्निंग कौन्सिलला हा अवघड निर्णय घेणे भाग पडले.

  • सोमवारचा (काल) दिवस आयपीएल स्पर्धा आणि बीसीसीआयसाठी विसरण्याजोगाच ठरला.

  • फिरकीपटू वरूण चक्रवर्ती आणि वेगवान गोलंदाज संदीप वॉरियर या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली.

  • कोलकाताचे पॅट कमिन्ससारखे काही खेळाडू आजारी पडले.

  • त्यामुळे सोमवारी होणारा कोलकाता विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना पुढे ढकलणे बीसीसीआयला भाग पडले.

  • त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बसची साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

  • दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममधील ग्राऊंड स्टाफपैकी पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती मिळाली.

  • मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही संघांनी दिल्लीच्या या मैदानात जाऊन सराव करणे टाळले.

  • त्यामुळे बीसीसीआय चिंतेत होते. परंतु, उर्वरित सामने ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचे सांगण्यात आले.

  • मंगळवारी (आज) सनरायजर्स हैदराबादचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा लेगस्पिनर अमित मिश्राला कोरोनाची बाधा झाली.

  • अधिकाधिक खेळाडूंना कोरोनाची लागण होत असल्याने बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने तातडीने बैठक बोलावली.

  • या बैठकीत आयपीएलचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -