Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : मोईन, जाडेजाने घेतली राजस्थानची फिरकी; CSK पुन्हा विजयी 

IPL 2021 : मोईन, जाडेजाने घेतली राजस्थानची फिरकी; CSK पुन्हा विजयी 

चेन्नईकडून जाडेजा आणि करनने २-२, तर मोईनने ३ विकेट घेतल्या. 

Related Story

- Advertisement -

मोईन अली आणि रविंद्र जाडेजा या फिरकी जोडगोळीच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ४५ धावांनी मात केली. हा चेन्नईचा सलग दुसरा विजय ठरला. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १८८ अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना सॅम करनने मनन वोहरा (१४) आणि कर्णधार संजू सॅमसन (१) यांना बाद करत राजस्थानला दोन झटके दिले. जॉस बटलरने ३५ चेंडूत ४९ धावांची खेळी केल्यावर त्याला जाडेजाने बाद केले. तर मोईनने डेविड मिलर (२), रियान पराग (३) आणि क्रिस मॉरिस (०) यांना माघारी पाठवत राजस्थानला अडचणीत टाकले. यातून राजस्थानचा संघ सावरू शकला नाही आणि त्यांना २० षटकांत ९ बाद १४३ धावाच करता आल्या. चेन्नईकडून जाडेजा आणि करनने २-२, तर मोईनने ३ विकेट घेतल्या.

डू प्लेसिस, मोईनने चेन्नईला सावरले

त्याआधी या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड केवळ १० धावा करून बाद झाला. यानंतर फॅफ डू प्लेसिस (३३) आणि मोईन (२६) यांनी चेन्नईचा डाव सावरला. हे दोघे बाद झाल्यावर अंबाती रायडू (२७) आणि ब्रावो (नाबाद २०) यांनी चांगली फलंदाजी केली. त्यामुळे चेन्नईने २० षटकांत ९ बाद १८८ अशी धावसंख्या उभारली. राजस्थानच्या चेतन सकारियाने ३ विकेट घेतल्या.

- Advertisement -