Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : धोनी-राहुलमध्ये आज टक्कर; किंग्सच्या लढतीत कोण मारणार बाजी?

IPL 2021 : धोनी-राहुलमध्ये आज टक्कर; किंग्सच्या लढतीत कोण मारणार बाजी?

चेन्नईचे पहिल्या विजयाची नोंद करण्याचे लक्ष्य असेल.

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्स आणि लोकेश राहुलचा पंजाब किंग्स या संघांमध्ये सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगेल. चेन्नईला यंदाच्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात चांगला खेळ करण्यात अपयश आले होते. त्यांचा दिल्ली कॅपिटल्सने ७ विकेट राखून पराभव केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात चेन्नईचे पहिल्या विजयाची नोंद करण्याचे लक्ष्य असेल. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली होती. सुरेश रैनाने चेन्नईच्या संघात पुनरागमन करताना ३६ चेंडूत ५४ धावांची खेळी केली होती. तसेच मोईन अली (३६), सॅम करन (३४) आणि रविंद्र जाडेजा (नाबाद २६) यांनी फटकेबाजी केली होती. त्यामुळे त्यांचा चांगला खेळ सुरु ठेवण्याचा प्रयत्न असेल.

गोलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा गरजेची

चेन्नईच्या गोलंदाजांनी मात्र पहिल्या सामन्यात निराशा केली होती. शार्दूल ठाकूरने दोन विकेट घेताना ५३ धावा खर्ची केल्या होत्या. दीपक चहर, करन, जाडेजा या प्रमुख गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नव्हती. त्यामुळे चेन्नईला आजच्या सामन्यात विजय मिळवायचा असल्यास गोलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे.

अर्शदीप सिंगचा भेदक मारा

- Advertisement -

पंजाब किंग्सने यंदाच्या सलामीच्या लढतीत राजस्थानला पराभूत करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली होती. त्यांच्याकडून कर्णधार राहुल (९१), दीपक हुडा (६४) आणि क्रिस गेल (१४) यांनी अप्रतिम फलंदाजी केली होती. तसेच गोलंदाजीत युवा अर्शदीप सिंगने ३ विकेट घेतल्या. त्याला मोहम्मद शमीने २ विकेट घेत उत्तम साथ दिली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात हे खेळाडू चांगली कामगिरी सुरु ठेवतील अशी पंजाबला आशा असेल.

- Advertisement -