Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : '४० बॉलमध्ये शतक करणार वाटतं!' पुजाराच्या नेट्समधील फटकेबाजीवर चाहते फिदा

IPL 2021 : ‘४० बॉलमध्ये शतक करणार वाटतं!’ पुजाराच्या नेट्समधील फटकेबाजीवर चाहते फिदा

पुजारा यंदा वेगळ्या स्टाईलमध्ये खेळताना दिसू शकेल. 

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आगामी मोसमाबाबत सध्या बरीच चर्चा आहे. या स्पर्धेत चेतेश्वर पुजारा कशी कामगिरी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे. पुजारा त्याच्या सावध आणि तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जातो. तसेच त्याला आयपीएलमध्ये याआधी आपली छाप पाडता आलेली नाही. पुजाराने कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स या संघाकडून खेळताना आतापर्यंत आयपीएलमध्ये ३० सामन्यांत ३९० धावा केल्या आहेत. तसेच त्याने या धावा केवळ ९९.७४ च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. त्याला २०१४ नंतर आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. यंदा मात्र तो चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाकडून खेळणार असून खेळाडू लिलावात त्याला सीएसकेने ५० लाख रुपयांत खरेदी केले. पुजारा यंदा वेगळ्या स्टाईलमध्ये खेळताना दिसू शकेल.

याचे कारण म्हणजे तो सीएसकेच्या नेट्समध्ये चांगलीच फटकेबाजी करताना दिसला. त्याने दीपक चहर आणि करण शर्मा यांसारख्या गोलंदाजांविरुद्ध फटकेबाजी केली. त्याच्या या फटकेबाजीवर चाहते फिदा झाले असून सोशल मीडियावर त्याचे कौतुक करत आहेत. तसेच त्याने त्याच्या स्टान्समध्येही थोडा बदल केल्याचे दिसले. त्यामुळे आता पुजारा यंदाच्या मोसमात कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.

- Advertisement -

- Advertisement -

 

 

- Advertisement -