घरक्रीडाIPL 2021 : युनिव्हर्स बॉस गेलचा विक्रम; 'ही' कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

IPL 2021 : युनिव्हर्स बॉस गेलचा विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

Subscribe

गेलने राजस्थानविरुद्ध ४० धावांची खेळी केली.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत काल राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद २२१ अशी धावसंख्या उभारली. पंजाबकडून कर्णधार लोकेश राहुलने ५० चेंडूत ९१ धावांची खेळी केली. त्याला दीपक हुडा (६४) आणि क्रिस गेल (४०) यांची उत्तम साथ लाभली. गेलने ४० धावांची खेळी २८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने केली. या खेळीदरम्यान गेलने अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर षटकार मारला आणि आयपीएल स्पर्धेत ३५० षटकार पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला.

अवघ्या १३२ डावांत ३५० षटकार

गेलने आयपीएलमध्ये अवघ्या १३२ डावांत ३५० षटकार पूर्ण केले. विशेष म्हणजे इतर एकाही फलंदाजाला २५० षटकारांचा टप्पाही अजून पार करता आलेला नाही. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एबी डिव्हिलियर्स दुसऱ्या स्थानावर असून त्याने १५७ डावांमध्ये २३७ षटकार मारले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी १८३ डावांत २१६ षटकारांसह तिसऱ्या स्थानी आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -