घरक्रीडाआयपीएलच्या १४ व्या मोसमात धोनी-रैना विरोधात खेळणार?

आयपीएलच्या १४ व्या मोसमात धोनी-रैना विरोधात खेळणार?

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या मोसमातील एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या यावर्षीच्या हंगामात धोनी-रैना विरोधात खेळणार असल्याच्या चर्चा सुरु असताना आता एक नविन माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार चेन्नई सुपर किंग्जने कर्णधार एमएस धोनी आणि सुरेश रैना यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्स त्यांचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ ला लिलावात उतरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एमएस धोनी आणि सुरेश रैना हे दोघेही आयपीएल २०२१ मध्ये खेळणार आहेत. या दोन्ही दिग्गजांना फ्रँचायझीने संघात ठेवलं आहे. ड्वेन ब्राव्हो, फाफ डू प्लेसिस आणि सॅम करन यांनाही कायम ठेवण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चेन्नई सुपर किंग्ज आगामी हंगामासाठी केदार जाधव, मुरली विजय, पियुष चावला आणि हरभजन सिंग यांना लिलावात उतरवणार आहे, तर शेन वॉटसन आधीच निवृत्त झाला आहे.

- Advertisement -

याशिवाय एक मोठी बातमीही समोर आली आहे. राजस्थान रॉयल्स आगामी हंगामापूर्वी आपला कर्णधार स्टीव्ह स्मिथला सोडण्याची शक्यता आहे. तसंच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर शिवम दुबे आणि ख्रिस मॉरिसला सोडण्याची शक्यता आहे. तर पार्थिव पटेल यापूर्वीच सेवानिवृत्त झाला आहे.

याशिवाय कोलकाता नाईट रायडर्स दिनेश कार्तिक आणि टॉम बँटनला रिलीज करू शकतात. त्याचबरोबर किंग्ज इलेव्हन पंजाब ख्रिस गेल, करुण नायर आणि शेल्डन कॉट्रेलला रिलीज करू शकतं. दिल्ली मार्कस स्टॉयनिसला रिटेन आणि शिमरन हेटमायरला रिलीज करू शकतं.

- Advertisement -

हेही वाचा – ‘हा’ स्टार खेळाडू मुंबई इंडियन्स संघातून आऊट? 


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -