घरक्रीडाIPL 2021 : पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या CSK चा टॉस जिंकून गोलंदाजीचा...

IPL 2021 : पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या CSK चा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

Subscribe

दोन्ही संघांमध्ये एकही बदल करण्यात आलेला नाही. 

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि पंजाब किंग्स (PBKS) या संघांमध्ये सामना होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. वानखेडेवर धावांचा पाठलाग करणारे संघ जास्त यशस्वी ठरत असल्याने आजच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. धोनीचा हा चेन्नईसाठी २०० वा सामना आहे. चेन्नईला यंदाच्या मोसमातील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पराभूत केले होते. त्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. मात्र, असे असले तरी चेन्नईने संघात बदल करणे टाळले आहे.

- Advertisement -

मागील सामन्यात चांगली कामगिरी केली

दुसरीकडे पंजाब किंग्सने यंदाच्या मोसमाची विजयी सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर मात केली होती. त्यामुळे त्यांनी आजच्या सामन्यासाठी संघात बदल केलेला नाही. पंजाबच्या संघात क्रिस गेल, निकोलस पूरन, रायली मेरेडीच आणि जाय रिचर्डसन या चार परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आम्ही मागील सामन्यात चांगली कामगिरी केली आणि या सामन्यातही खेळपट्टीशी जुळवून घेण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे कर्णधार लोकेश राहुल नाणेफेकीच्या वेळी म्हणाला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -