Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : मिलर, मॉरिसची फटकेबाजी; राजस्थानने उघडले विजयाचे खाते

IPL 2021 : मिलर, मॉरिसची फटकेबाजी; राजस्थानने उघडले विजयाचे खाते

अखेरच्या षटकात १२ धावांची आवश्यकता असताना मॉरिसने दोन षटकार मारत राजस्थानला विजय मिळवून दिला.

Related Story

- Advertisement -

डेविड मिलर आणि क्रिस मॉरिस या दक्षिण आफ्रिकन फलंदाजांच्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर ३ विकेट राखून मात केली. राजस्थानचा हा यंदाच्या मोसमातील पहिला विजय ठरला. या सामन्यात राजस्थानने दिल्लीला २० षटकांत ८ बाद १४७ धावांवर रोखले होते. याचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. त्यांची ५ बाद ४२ अशी अवस्था होती. मात्र, मिलरने उत्कृष्ट फलंदाजी करत ४३ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर मॉरिसने १८ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात १२ धावांची आवश्यकता असताना मॉरिसने टॉम करनच्या गोलंदाजीवर दोन षटकार मारत राजस्थानला विजय मिळवून दिला.

उनाडकटच्या तीन विकेट

त्याआधी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. जयदेव उनाडकटने पृथ्वी शॉ (२), शिखर धवन (९) आणि अजिंक्य रहाणे (८) यांना झटपट बाद केले. यानंतर मात्र कर्णधार रिषभ पंतने दिल्लीचा डाव सावरला. त्याने ३२ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. त्याला ललित यादव (२०) आणि टॉम करन (२१) यांची काहीशी साथ लाभली. त्यामुळे दिल्लीने २० षटकांत ८ बाद १४७ अशी धावसंख्या उभारली. राजस्थानच्या उनाडकटने तीन, तर मुस्ताफिझूर रहमानने दोन विकेट घेतल्या.

- Advertisement -