घरक्रीडाIPL 2021 : दीपक चहरचा भेदक मारा; CSK ने केली पहिल्या विजयाची नोंद

IPL 2021 : दीपक चहरचा भेदक मारा; CSK ने केली पहिल्या विजयाची नोंद

Subscribe

चेन्नईने पंजाब किंग्सवर ६ विकेट राखून मात केली.

वेगवान गोलंदाज दीपक चहरने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आयपीएलच्या सामन्यात पंजाब किंग्सवर (PBKS) ६ विकेट राखून मात केली. हा चेन्नईचा यंदाच्या मोसमातील पहिला विजय ठरला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने पंजाबला २० षटकांत केवळ ८ बाद १०६ धावांवर रोखले होते. चेन्नईच्या दीपक चहरने अवघ्या १३ धावांत ४ विकेट घेतल्या. १०७ धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने लवकर बाद झाला. यानंतर मात्र फॅफ डू प्लेसिस (नाबाद ३६) आणि मोईन अली (४६) या परदेशी खेळाडूंनी अप्रतिम फलंदाजी केली. त्यांनी ६६ धावांची भागीदारी रचल्याने चेन्नईने हा सामना ६ विकेट आणि २६ चेंडूत राखून जिंकला.

शाहरुख खानची झुंजार फलंदाजी

त्याआधी या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. धोनीचा हा चेन्नईसाठी २०० वा सामना होता. चेन्नईच्या दीपक चहरने सुरुवातीपासूनच योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल ५ धावांवर धावचीत झाला. तर चहरने मयांक अगरवाल (०), क्रिस गेल (१०), दीपक हुडा (१०) आणि निकोलस पूरन (०) यांना झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र, शाहरुख खानने झुंजार फलंदाजी करत ४७ धावांची खेळी केल्याने पंजाबला १०० धावांचा टप्पा पार करता आला. पंजाबने २० षटकांत ८ बाद १०६ अशी धावसंख्या उभारली.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -