Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सच्या प्रमुख खेळाडूला कोरोनाची बाधा 

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सच्या प्रमुख खेळाडूला कोरोनाची बाधा 

दुसऱ्यांदा कोरोना चाचणी झाली, तेव्हा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेबाबत सध्या बरीच चर्चा सुरु आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. मात्र, या मोसमावर कोरोनाचे सावट आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू नितीश राणाला कोरोनाची बाधा झाली होती. काही दिवसांनी त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. परंतु, आता आणखी एका खेळाडूला कोरोनाची बाधा झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ‘दिल्लीचा अष्टपैलू अक्षर पटेलचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. २८ मार्चला मुंबईत दाखल झाल्यावर त्याचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, त्यानंतर दुसऱ्यांदा कोरोना चाचणी झाली, तेव्हा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला,’ असे दिल्ली कॅपिटल्सकडून सांगण्यात आले.

यंदाच्या मोसमात महत्वाची भूमिका

अक्षरने मागील आयपीएल मोसमात १५ सामन्यांमध्ये ९ विकेट घेतल्या होत्या. तसेच फलंदाजीत त्याने ११७ धावाही केल्या. ही कामगिरी भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी पुरेशी ठरली. त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तीन सामन्यांत २७ विकेट घेण्याची उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे यंदाच्या आयपीएल मोसमात तो दिल्लीकडून महत्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.

कोरोनाचे सावट

- Advertisement -

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे आयपीएलच्या मुंबईतील सामन्यांचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यंदाच्या मोसमात दहा साखळी सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहेत. मात्र, आता या सामन्यांवरही कोरोनाचे सावट आहे. वानखेडे स्टेडियमवरील ग्राऊंड स्टाफपैकी १० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आता मुंबईतील सामने हे इतरत्र घेण्याबाबत बीसीसीआयला विचार करावा लागू शकेल.

- Advertisement -