Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : राजस्थानविरुद्ध स्वस्तात बाद झालेल्या पृथ्वी शॉच्या नावे नकोसा विक्रम

IPL 2021 : राजस्थानविरुद्ध स्वस्तात बाद झालेल्या पृथ्वी शॉच्या नावे नकोसा विक्रम

पृथ्वी राजस्थानविरुद्ध ५ चेंडूत केवळ २ धावा करून बाद झाला.

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. राजस्थानचा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि या संधीचा चांगला फायदा करत त्याने दिल्लीला अडचणीत टाकले. त्याने पृथ्वी शॉ (२) आणि शिखर धवन (९) या सलामीवीरांसह अजिंक्य रहाणेला (८) स्वस्तात माघारी पाठवले. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पृथ्वीने ७२ धावांची अप्रतिम खेळी केली होती. राजस्थानविरुद्ध मात्र त्याला फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. त्यामुळे त्याच्या नावे नकोसा विक्रम झाला आहे.

पृथ्वी राजस्थानविरुद्ध ५ चेंडूत केवळ २ धावा करून बाद झाला. आयपीएलमध्ये २०१९ पासून एकेरी (१० हून कमी) धावसंख्येवर बाद होण्याची ही पृथ्वीची तब्बल १५ वी वेळ ठरली. त्यामुळे पृथ्वी २०१९ पासून सर्वाधिक वेळा एकेरी धावसंख्येवर बाद होणारा फलंदाज ठरला आहे. या यादीत कोलकाता नाईट रायडर्सचा यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक दुसऱ्या स्थानावर आहे.

२०१९ पासून सर्वाधिक वेळा एकेरी धावसंख्येवर बाद होणारे फलंदाज 
- Advertisement -

पृथ्वी शॉ  – १५
दिनेश कार्तिक – १३
अक्षर पटेल – ११
शेन वॉटसन – ११
संजू सॅमसन – ११

- Advertisement -