IPL 2021 : धोनीची सर्वात मोठी फॅन ; CSK साठी प्रार्थना करणाऱ्या झिवाचा फोटो व्हायरल

महेंद्र सिंग धोनीची मुलगी झिवा तिच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे नेहमीच नेटकऱ्यांच्या चर्चेत असते.

IPL 2021: Dhoni's biggest fan; Photo of Ziva praying for CSK goes viral
IPL 2021 : धोनीची सर्वात मोठी फॅन ; CSK साठी प्रार्थना करणाऱ्या झिवाचा फोटो व्हायरल

महेंद्र सिंग धोनीची मुलगी झिवा सिंग धोनी सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. सोमवारी झालेल्या क्रिकेटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चे समर्थन करणारे क्रिकेटचे चाहते दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाविरुद्धचा सामना हरल्यानंतर निराश झाले.मात्र याच सामन्या दरम्यान धोनीची सर्वात मोठी फॅन म्हणजे त्याची मुलगी झिवा पप्पांच्या टीमसाठी प्रार्थना करत होती. झिवाचा हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला असून, चेन्नई सुपर किंग्ज च्या चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी या फोटोला पसंती दाखवली आहे. सध्या सोशल मीडियावर दुबई स्टेडियममधील व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये झिवा आपली आई साक्षी धोनीसोबत बसली असून,हात जोडून आणि डोळे बंद करुन सीएसके टीमसाठी प्रार्थना करत आहे. महेंद्र सिंग धोनीची मुलगी झिवा तिच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे नेहमीच नेटकऱ्यांच्या चर्चेत असते. धोनीची पत्नी साक्षी सतत काहींना काही झिवाचे फोटो किंवा व्हिडिओ इंस्टाग्राम पेजवर अपलोड करत असते.

 

सीएसकेच्या अनेक चाहत्यांनी झिवाच्या या भावूक फोटोचे कमेंटच्या माध्यमातून कौतुक केले जात आहे. हा व्हायरल फोटो अनेकांनी रीशेअर केला आहे. ‘आजच्या दिवसाचा सुंदर क्षण’ , ‘ पप्पांच्या टीमसाठी झिवाची प्रार्थना म्हणजे अविस्मरणीय गोष्ट’ अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी झिवाच्या फोटोला पसंती दिली आहे. सोमवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (DC) ने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा तीन गडी राखून पराभव केला.

आयपीएल २०२१ च्या हंगामात धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने जोरदार प्रदर्शन करत वापसी केली. या हंगामात १६ अंक मिळवून प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ सीएसके ठरला आहे. त्याच्या कर्णधारपदाच्या जोरावर संघाने आतापर्यंत १३ सामने खेळले आणि ९ सांमन्यात विजय प्राप्त केला आहे, तर ४ सामन्यांत पराभव स्विकारावा लागला आहे. धोनीचा संघ ज्या पध्दतीने खेळत आहे, त्या लयातच खेळत राहिला तर यंदाचा आयपीएल किताब देखील आपल्या नावे करण्याची शक्यता आहे.


हे ही वाचा – Cruise drug bust : क्रूझ कारवाईतील मनीष भानूशालीचे भाजप कनेक्शन, मोदी, शाह, फडणवीसांसोबत फोटो