Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 सुरू होण्यापूर्वीच ट्विस्ट, इंग्लंडच्या खेळाडूंनी माघार घेतल्यानं फ्रेंचायझींची BCCI कडे...

IPL 2021 सुरू होण्यापूर्वीच ट्विस्ट, इंग्लंडच्या खेळाडूंनी माघार घेतल्यानं फ्रेंचायझींची BCCI कडे तक्रार

खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतल्यामुळे संघ त्यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे बीसीसीआयला पत्र लिहिले आहे.

Related Story

- Advertisement -

आयपीएल २०२१ चा रणसंग्राम पुन्हा सुरु होणार आहे. मात्र आयपीएल सुरु होण्यापुर्वीच इंग्लंडच्या खेळाडूंनी माघार घेतली असल्यामुळे मोठा ट्विस्ट आला आहे. आयपीएल २०२१ येत्या १९ सप्टेंबरपासून सुरु होत असल्यामुळे सर्व खेळाडू युएईमध्ये दाखल झाले आहेत. आयपीएलचा पहिल्या सामन्यापुर्वीच ऐनवेळी इंग्लंडच्या ३ खेळाडूंनी वैयक्तिक कारण देत माघार घेतली आहे. संबंधित संघांनी त्यांच्या बदलीच्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. मात्र या सगळ्या गोंधळामुळे काही संघांना अनेक अडचणी आल्या असून त्यांनी बीसीसीआयकडे तशी तक्रार केली आहे.

खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतल्यामुळे संघ त्यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे बीसीसीआयला पत्र लिहिले आहे. खेळाडूंनी संघाला गुरुवारी अधिकृत माहिती दिली होती की, १५ सप्टेंबरला युएईला पोहचतील परंतु सामन्याच्या ८ दिवसांपुर्वी खेळाडूंनी येत नसल्याचे कळवले आहे. सदर पद्धत कराराच्या विरोधात असल्याचे संघांनी बीसीसीआयला कळवले आहे.

इंग्लंडच्या या खेळाडूंची माघार

- Advertisement -

जॉनी बेअरस्टो – सनरायजर्स हैदराबाद
ख्रिस वोक्स – दिल्ली कॅपिटल्स
डेव्हिड मलान – पंजाब किंग्स

संघाकडून बदलीच्या खेळाडूंची नावे जाहीर

पंजाब किंग्जमध्ये डेव्हिड मलानच्या बदली ऐडन मार्क्राम
सनरायझर्स हैदराबादमध्ये जॉनी बेअरस्टोच्या बदली शेरफेन रुदरफोर्डचा

एकूण ६ खेळाडूंची माघार

- Advertisement -

आयपीएल २०२१ सुरु होण्यापुर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि वैयक्तिक कारणांमुळे एकूण ६ खेळाडूंनी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जॉनी बेअरस्टो – सनरायजर्स हैदराबाद, ख्रिस वोक्स – दिल्ली कॅपिटल्स , डेव्हिड मलान – पंजाब किंग्स यांचा समावेश आहे. तर या आधीच राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जॉस बटलर, जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स यांनी आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. स्टोक्स मानसिक स्थितीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. आर्चरच्या कोपरावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर जॉस बटलरच्या पत्नीने नुकताच बाळाला जन्म दिला आहे. यामुळे या खेळाडूंनी माघार घेतली आहे.

- Advertisement -