घरक्रीडाIPL 2021 : बीसीसीआय परदेशी खेळाडूंना उर्वरित मोसमात खेळायला लावणार; फ्रेंचायझींना विश्वास

IPL 2021 : बीसीसीआय परदेशी खेळाडूंना उर्वरित मोसमात खेळायला लावणार; फ्रेंचायझींना विश्वास

Subscribe

परदेशी खेळाडूंना उर्वरित मोसमात खेळण्यासाठी बीसीसीआय तयार करेल, असा फ्रेंचायझींना विश्वास आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम मागील महिन्यात अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. कोरोनाने बायो-बबलमध्ये शिरकाव केल्याने बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला हा निर्णय भाग पडले होते. परंतु, मागील शनिवारी झालेल्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत आयपीएलचा उर्वरित मोसम सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईत खेळण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, या स्पर्धेपूर्वी आणि स्पर्धेनंतर बरेच आंतरराष्ट्रीय सामने होणार असल्याने परदेशी खेळाडू आयपीएलच्या उर्वरित मोसमात खेळण्याबाबत साशंकता आहे. मात्र, परदेशी खेळाडूंना उर्वरित मोसमात खेळण्यासाठी बीसीसीआय तयार करेल, असा फ्रेंचायझींना विश्वास आहे.

सर्व बोर्डांशी चर्चा करणार 

बीसीसीआयची शनिवारी विशेष सर्वसाधारण सभा झाली. त्यानंतर आम्हाला आयपीएलचा उर्वरित मोसम युएईमध्ये पार पडेल ही माहिती मिळाली आहे. तसेच बीसीसीआयचे अधिकारी सध्या युएईमध्ये असून त्यांनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाशी (ECB) संवाद साधला आहे. परदेशी खेळाडूंनाआयपीएलच्या उर्वरित मोसमासाठी उपलब्ध करून देण्याविषयी बीसीसीआय सर्व बोर्डांशी चर्चा करणार असल्याचेही आम्हाला समजले आहे, असे एका फ्रेंचायझीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisement -

परदेशी खेळाडूंची भूमिका महत्वाची

परदेशी खेळाडू हे प्रत्येक संघासाठी खूप महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे काही परदेशी खेळाडू न खेळल्यास, त्यांची जागा घेऊ शकतील असे खेळाडू आम्हाला शोधावे लागतील. परंतु, बीसीसीआय इतर बोर्डांना त्यांचे खेळाडू आयपीएलमध्ये पाठवण्यासाठी तयार करतील असा आम्हाला विश्वास आहे, असेही या फ्रेंचायझींच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. तसेच आयपीएल संघ ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात युएईला जाण्याची शक्यता असून बीसीसीआयशी कोरोनाबाबतच्या नियमांची चर्चा झाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -