घरक्रीडाIPL 2021 : ...म्हणून आयपीएल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली; अश्विनने सांगितले कारण

IPL 2021 : …म्हणून आयपीएल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली; अश्विनने सांगितले कारण

Subscribe

दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अश्विनला ८ पैकी ५ सामनेच खेळता आले.

भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला यंदा इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या मध्यातून माघार घ्यावी लागली होती. दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अश्विनला ८ पैकी ५ सामनेच खेळता आले. त्यानंतर त्याने वैयक्तिक कारणाने या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याने माघार घेतल्यानंतर साधारण दहा दिवसांतच आयपीएलचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. परंतु, अश्विनने आता आयपीएल स्पर्धेतून माघार घेण्याचे कारण स्पष्ट केले आहे. त्याच्या कुटुंबापैकी १० जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या विचाराने अश्विन ८-९ दिवस झोपू शकला नव्हता. त्यामुळे त्याने आयपीएल स्पर्धेतून माघार घेत घरी परत जाण्याचा निर्णय घेतला.

८-९ दिवस झोपू शकलो नव्हतो

माझ्या कुटुंबातील जवळपास सर्वांनाच कोरोनाची बाधा झाली होती. इतकेच काय, तर माझ्या काही चुलत भावांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यांची प्रकृती नाजूक होती, पण काही काळात ते बरे झाले. परंतु, कुटुंबाच्या विचाराने मी ८-९ दिवस झोपू शकलो नव्हतो. मला मानसिक ताण जाणवत होता. त्यामुळे मी आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच सोडून पुन्हा घरी जाण्याचा निर्णय घेतला, असे अश्विनने सांगितले.

- Advertisement -

पुनरागमनाचा विचार केला पण…

कुटुंबियांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर अश्विनने स्पर्धेत पुनरागमन करण्याचाही विचार केला होता. मात्र, त्याआधीच आयपीएलचा मोसम स्थगित झाला. अश्विन सध्या भारतीय संघासोबत मुंबईत क्वारंटाईन आहे. भारतीय संघ २ जूनला इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ सहा कसोटी सामने खेळणार असून अश्विन भारतासाठी महत्वाची भूमिका बजावेल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -