घरक्रीडाIPL 2021 : घरी परतण्यापेक्षा बायो-बबलमध्ये राहणे सुरक्षित; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचे मत 

IPL 2021 : घरी परतण्यापेक्षा बायो-बबलमध्ये राहणे सुरक्षित; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचे मत 

Subscribe

तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी उर्वरित मोसमातून माघार घेत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.

भारतात कोरोनाची स्थिती गंभीर होताना दिसत असल्याने काही क्रिकेटपटूंनी इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेतून माघार घेतली आहे. राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज अँड्र्यू टाय, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे केन रिचर्डसन आणि अ‍ॅडम झॅम्पा या तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी उर्वरित मोसमातून माघार घेत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. मात्र, याबाबतची माहिती कळल्यावर मुंबई इंडियन्सचा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज नेथन कुल्टर-नाईलला आश्चर्य वाटले. प्रत्येकाला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. मात्र, मला घरी परतण्यापेक्षा बायो-बबलमध्ये राहणे सध्याच्या घडीला अधिक सुरक्षित वाटते, असे कुल्टर-नाईल म्हणाला.

परत गेल्याचे ऐकून आश्चर्य वाटले

कोरोना काळात आयपीएल होत असल्याने खेळाडूंना बायो-बबलमध्ये राहावे लागत आहे. त्यांना हॉटेलमधून बाहेर पडण्याची किंवा बाहेरील व्यक्तींना भेटण्याची परवानगी नाही. त्यामुळे बायो-बबलमध्ये राहणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे कुल्टर-नाईलला वाटते. टाय,रिचर्डसन आणि झॅम्पा ऑस्ट्रेलियाला परत गेल्याचे ऐकून मला आश्चर्य वाटले. मात्र, त्यांच्याशी बोलल्यावर त्यांनी हा निर्णय का घेतला ते मला समजले, असे कुल्टर-नाईल म्हणाला.

- Advertisement -

बायो-बबलमध्ये राहणे सुरक्षित

मी थोड्या वेळापूर्वीच झॅम्पाशी संवाद साधला आणि घरी परतणे त्याच्यासाठी का महत्वाचे आहे, हे त्याने सांगितले. त्याच्यासाठी बहुधा तो निर्णय योग्य होता. मात्र, मला घरी परतण्यापेक्षा बायो-बबलमध्ये राहणे सध्याच्या घडीला अधिक सुरक्षित वाटते, असे कुल्टर-नाईलने स्पष्ट केले. कुल्टर-नाईलला मागील खेळाडू लिलावात मुंबईने ५ कोटी रुपयांत खरेदी केले होते. परंतु, यंदा त्याला अजून सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -