घरक्रीडाIPL 2021 : मला राजस्थानने कशासाठी संघात घेतले हे माहितेय - मॉरिस

IPL 2021 : मला राजस्थानने कशासाठी संघात घेतले हे माहितेय – मॉरिस

Subscribe

मॉरिसने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १८ चेंडूत चार षटकारांच्या मदतीने नाबाद ३६ धावांची खेळी केली.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुरुवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला जिंकण्यासाठी अखेरच्या षटकात १२ धावांची गरज होती. टॉम करनने टाकलेल्या या षटकात अष्टपैलू क्रिस मॉरिसने दोन षटकार मारत राजस्थानला विजय मिळवून दिला. मॉरिसने या सामन्यात १८ चेंडूत चार षटकारांच्या मदतीने नाबाद ३६ धावांची खेळी केली. मात्र, काही दिवस आधीच पंजाब किंग्सविरुद्ध राजस्थानचा पराभव झाला आणि या सामन्यात दोन चेंडू शिल्लक असताना कर्णधार संजू सॅमसनने मॉरिसला एक धाव काढण्यास नकार देत स्ट्राईक आपल्याकडेच ठेवली. मॉरिसला ही गोष्ट फारशी आवडली नव्हती. परंतु, त्यावेळी मी चिडलो नव्हतो, असे मॉरिसने स्पष्ट केले.

सामना जिंकलो याचे समाधान

संजू पंजाबविरुद्ध अप्रतिम फलंदाजी करत होता. त्यामुळे दोन धावा काढून स्वतः धावचीत होण्याचा धोका पत्करण्यास मी तयार होतो. त्यावेळी चेंडू संजूच्या बॅटच्या मध्यभागी लागत होता. त्यामुळे त्याने षटकार मारून आम्हाला सामना जिंकवल्याचा मला आनंदच झाला असता. मात्र, दिल्लीविरुद्धचा सामना आम्ही जिंकलो याचे समाधान आहे, असे मॉरिसने सांगितले.

- Advertisement -

फटकेबाजी करण्यासाठी संघात

मॉरिसला खेळाडू लिलावात राजस्थानने १६.२५ कोटी रुपयांत खरेदी केले होते. याबाबत विचारले असता मॉरिस म्हणाला, फ्रेंचायझीस काही फलंदाजांना मोठ्या धावा करण्यासाठी पैसे देतात, तर काही फलंदाजांना मोठे फटके मारण्यासाठी पैसे देतात. माझी भूमिका मला ठाऊक आहे. राजस्थानने मला फटकेबाजी करण्यासाठी संघात घेतले आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -