IPL 2021 : जसप्रीत बुमराह एलीट १०० क्लबमध्ये दाखल

एलीट १०० क्लबमध्ये २०० सामन्यांसह पहिल्या स्थानावर आरसीबीचा खेळाडू विराट कोहली आहे.

IPL 2021: Jaspreet Bumrah joins enter in elit 100 Club
IPL 2021 : जसप्रीत बुमराह एलीट १०० क्लबमध्ये दाखल

आयपीएल २०२१ चे दुसरे सत्र युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. या सत्रादरम्यान अनेक खेळाडूंनी विक्रम पुर्ण केले आहेत. भारतीय क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू जसप्रीत बुमराह एलीट १०० क्लबमध्ये दाखल झाला आहे. ज्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये एकाच संघाकडून १०० पेक्षा अधिक सामने खेळले आहेत त्यांचे नाव एलिट १०० क्लबमध्ये टाकण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सचा खेळाडू जसप्रीत बुमराहने या एलीट १०० क्लबमध्ये नुकताच प्रवेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान बुमराहचे १०० एकाच संघाकडून १०० सामने झाले आहेत. जसप्रीत बुमराह आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या सत्रामध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत आहे.

एलीट १०० क्लबमध्ये २०० सामन्यांसह पहिल्या स्थानावर आरसीबीचा खेळाडू विराट कोहली आहे. तर मुंबई इंडियन्सचा खेळाडू १७२ कीरोन पोलार्ड दुसऱ्या स्थानावर आहे. केकेआर खेळाडून सुनील नरेन १२५ तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचा खेळाडू लसिथ मलिंगा १२२ सामन्यांसह चौथ्या स्थानावर आहे. तर जसप्रीत बुमराह १०० सामन्यांसह पाचव्या स्थानावर आहे.

रोहित शर्माही विक्रमाच्या दिशेने

भारतीय खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा फलंदाज नव्या विक्रमाच्या प्रतिक्षेत असून केवळ काही दिवसांत हा विक्रम पुर्ण होऊ शकतो. रोहित शर्मा टी २० क्रिकेटमध्ये ४०० षटकारचा नवा विक्रम करण्यापासून केवळ ३ षटकार दूर आहे. आगामी सामन्यात रोहितने ३ षटकार मारल्या तर त्याचा ४०० षटकारचा विक्रम पुर्ण होईल. भारतीय खेळाडूंमध्ये अद्याप ३५० षटकार कोणीही केले नाहीत. रोहित शर्मा सध्याच्या यादीमध्ये ८ व्या स्थानावर असून प्रथम स्थानावर वेस्टइंडिजचा खेळाडू ख्रिस गेल आहे. क्रिस गेलने आपल्या टी २० क्रिकेट कारकिर्दीमध्ये आश्चर्यकारक १०४२ षटकार मारले आहेत. वेस्ट इंडिजचा सध्याचा मर्यादित षटकांचा कर्णधार किरॉन पोलार्ड ७५६ षटकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर आंद्रे रसेल ५०९ षटकारांसह तिसऱ्या स्थानी आहे.


हेही वाचा : नव्या विक्रमापासून रोहित शर्मा केवळ ३ षटकार दूर