घरक्रीडाIPL 2021 : कर्णधार म्हणून धोनीचे यश इतर यष्टिरक्षकांना ठरतेय फायदेशीर!

IPL 2021 : कर्णधार म्हणून धोनीचे यश इतर यष्टिरक्षकांना ठरतेय फायदेशीर!

Subscribe

यंदाच्या मोसमात एकूण चार यष्टीरक्षक आपापल्या संघांचे नेतृत्व करत आहेत.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स या संघांमध्ये सामना होत आहे. यंदाच्या मोसमात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व संजू सॅमसन, तर पंजाब किंग्सचे नेतृत्व लोकेश राहुल करत आहे. हे दोघेही यष्टीरक्षक आहेत. यंदाच्या मोसमात एकूण चार यष्टीरक्षक आपापल्या संघांचे नेतृत्व करत आहेत. सॅमसन आणि राहुलसह महेंद्रसिंग धोनी (चेन्नई सुपर किंग्स) आणि रिषभ पंत (दिल्ली कॅपिटल्स) हे आपापल्या संघाचे कर्णधारपद भूषवत आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि भारताचे नेतृत्व करताना धोनीला मिळालेल्या यशामुळे आता अधिकाधिक आयपीएल संघ यष्टिरक्षकांची कर्णधारपदी निवड करत असल्याचे मत राजस्थान रॉयल्सचा इंग्लिश खेळाडू जॉस बटलरने व्यक्त केले.

यष्टिरक्षकाला निर्णय घेणे सोपे

धोनीला चेन्नईचे नेतृत्व करताना खूप यश मिळाले आहे. त्याने कर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली असून इतर यष्टीरक्षक त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यष्टीरक्षक यष्टींमागे उभा राहत असल्याने संपूर्ण सामना त्याच्यासमोर होत असतो. त्यामुळे खेळपट्टी कशी आहे आणि गोलंदाज कसा मारा करत आहेत, याचा सर्वात चांगला अंदाज हा यष्टिरक्षकाला येतो. यष्टिरक्षकाला कर्णधार म्हणून निर्णय घेणे थोडे सोपे जाते, असे बटलरने सांगितले.

- Advertisement -

सॅमसन चांगल्या कामगिरीस उत्सुक  

यंदाच्या मोसमात संजू सॅमसन पहिल्यांदाच राजस्थानचे नेतृत्व करत आहे. त्याविषयी बटलर म्हणाला, संजू हा प्रतिभावान खेळाडू असून बराच काळ राजस्थानकडून खेळत आहे. तो खूप शांत आहे. मात्र, त्याला मजा करायलाही आवडते. खेळाडूंनी खेळाचा आनंद घेणे गरजेचे आहे आणि संजू हेच खेळाडूंना सांगत आहे. तो कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -