घरक्रीडाIPL 2021 : माघार घेतलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंची हवाई वाहतूक बंदीवर मात; मायदेशी...

IPL 2021 : माघार घेतलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंची हवाई वाहतूक बंदीवर मात; मायदेशी परतले

Subscribe

दोन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू गुरुवारी मेलबर्नमध्ये दाखल झाले.

भारतात कोरोनाचा धोका वाढत असल्याने भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांवर ऑस्ट्रेलियाने बंदी घातली आहे. मात्र, आयपीएल स्पर्धेतून माघार घेतलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना या हवाई वाहतूक बंदीवर मात करण्यात यश आले. या क्रिकेटपटूंनी मिडल ईस्टहून ऑस्ट्रेलिया गाठले. केन रिचर्डसन आणि अ‍ॅडम झॅम्पा हे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू गुरुवारी मेलबर्नमध्ये दाखल झाले असून आता त्यांना काही दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांना १५ मेपर्यंत प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मंगळवारी केली होती. त्यामुळे ही बंदी वाढल्यास आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू मायदेशी कसे परतणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भारताहून दोहा आणि दोहाहून मेलबर्न प्रवास 

केन रिचर्डसन आणि झॅम्पा हे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यंदा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळत होते. परंतु, भारतातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन त्यांनी आयपीएलमधून माघार घेत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. या दोघांना ऑस्ट्रेलियात परतण्यासाठी विशेष सवलत दिली जाणार नसल्याचे म्हटले जात होते. या दोघांनी स्वतःच तिकिटे बुक करून ऑस्ट्रेलिया गाठले. त्यांनी आधी भारत ते दोहा असा प्रवास केला आणि त्यानंतर ते दोहाहून मेलबर्नमध्ये दाखल झाले.

- Advertisement -

आयपीएलमध्ये १४ ऑस्ट्रेलियन खेळाडू 

रिचर्डसन आणि झॅम्पा यांच्याप्रमाणेच ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज अँड्र्यू टायनेही आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच सोडण्याचा निर्णय घेतला होता. तो काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियात दाखल झाला होता. या तिघांनी आयपीएलमधून माघार घेतली असली तरी अजूनही डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथसह १४ ऑस्ट्रेलियन खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -