Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : पंजाबविरुद्ध KKR संघाने वापरला कोड वर्ड? सेहवागची जोरदार टीका  

IPL 2021 : पंजाबविरुद्ध KKR संघाने वापरला कोड वर्ड? सेहवागची जोरदार टीका  

गोलंदाजी सुरु असताना कोलकाताच्या सपोर्ट स्टाफकडून डगआऊटमधून खेळाडूंना इशारे आणि सूचना देण्यासाठी कोड वर्डचा वापर केला गेल्याचे दिसले.

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) सोमवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्सवर ५ विकेट राखून मात केली. हा कोलकातासाठी खूप महत्वाचा विजय होता. याआधी त्यांना पाच पैकी केवळ एक सामना जिंकता आला होता. त्यामुळे हा संघ गुणतक्त्यात तळाला होता. पंजाबवर मात करत कोलकाताने सहाव्या स्थानी झेल घेतली. मात्र, कोलकाताच्या या विजयापेक्षा त्यांनी या सामन्यात केलेल्या एका कृतीची अधिक चर्चा रंगली. या सामन्यात कोलकाताने प्रथम गोलंदाजी केली. गोलंदाजी सुरु असताना कोलकाताच्या सपोर्ट स्टाफकडून डगआऊटमधून खेळाडूंना इशारे आणि सूचना देण्यासाठी कोड वर्डचा वापर केला गेल्याचे दिसले. हा नक्की काय प्रकार होता हे स्पष्ट झाले नसले, तरी भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने कोलकाता संघावर टीका केली आहे.

कोणीही कर्णधार बनू शकतो नाही का?

आपण अशाप्रकारचे कोड मेसेजेस लष्करात पाहिले होते. एका गोलंदाजाला ठराविक वेळेला गोलंदाजी देण्यासाठी ५४ हा कोड वर्ड असावा, जेणेकरुन मैदानात कर्णधार मॉर्गनला थोडी मदत मिळू शकेल. मात्र, सामना मैदानाबाहेरूनच नियंत्रित केला जाणार असेल, तर कोणीही कर्णधार बनू शकतो नाही का? कर्णधाराने आपल्या बुद्धीचा वापर करून परिस्थितीनुसार निर्णय घेणे अपेक्षित असते. मॉर्गनकडेही कर्णधार म्हणून प्रचंड क्षमता आहे. तो वर्ल्डकप विजेता कर्णधार आहे, असे सेहवाग म्हणाला.

नेमका काय होता प्रकार?

- Advertisement -

कोलकाता आणि पंजाब यांच्यातील सामन्यात पंजाबची दहाव्या षटकात ३ बाद ४७ अशी धावसंख्या होती. कोलकाताकडून हे षटक प्रसिध कृष्णा टाकत होता, तर पंजाबकडून मयांक अगरवाल फलंदाजी करत होता. त्यावेळी कोलकाताच्या डगआऊटमधून ५४ असा आकडा दाखवण्यात येत होता. यामागे नेमके काय कारण होते हे अजून स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -