घरक्रीडाIPL मध्ये कोरोनाची एन्ट्री, KKR च्या दोन खेळाडूंना कोरोना, आज होणारा सामना...

IPL मध्ये कोरोनाची एन्ट्री, KKR च्या दोन खेळाडूंना कोरोना, आज होणारा सामना लांबणीवर

Subscribe

देशात एकीकडे कोरोनाचा कहर सुरु असताना दुसरीकडे बायोबबलमध्ये IPL चा १४ वा हंगाम सुरु आहे. मात्र, आता बायोबबलमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) च्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आज कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) सामना स्थगित करण्यात आला आहे.

KKR चा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि वेगवान गोलंदाज संदिप वॉरियर या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. या दोन्ही खेळाडूंना आयोसलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याच्यासह पाच खेळाडू आजारी असल्याची माहिती समोर येत आहे. संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानं संपूर्ण संघाला क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

- Advertisement -

कोलकाता संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे RCB चे खेळाडू त्यांच्याविरोधात मैदानात उतरण्यास तयार नाहीत. वरुण आणि संदीपची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलण्यात आला आहे’, अशी माहिती एएनआयला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.

- Advertisement -

वरुण चक्रवर्ती नुकताच त्याच्या खांद्याच्या स्कॅनसाठी बायो बबलच्या बाहेर गेला होता. त्याच वेळी कोरोनाने त्याला गाठलं असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बीसीसीआयनं कठोर केले होते बायो बबलचे नियम

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने काही दिवसांपूर्वी बायो बबलचे नियम कठोर केले होते. खेळाडूंच्या दर दोन दिवसांनी कोरोना चाचण्या केल्या जात होत्या. तसेच खेळाडूंना हॉटेलबाहेरुन जेवण आणण्यासाठीही मनाई केली होती.

 

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -