घरक्रीडाIPL 2021 : केकेआरची प्रथम गोलंदाजी; मुंबईच्या संघात एक बदल

IPL 2021 : केकेआरची प्रथम गोलंदाजी; मुंबईच्या संघात एक बदल

Subscribe

केकेआरने संघात एकही बदल केला नाही. 

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात सामना होत आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केकेआरने यंदाच्या मोसमाची विजयाने सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर मात केली होती. त्या सामन्यात जवळपास सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्याने आजच्या सामन्यात केकेआरने संघात एकही बदल केलेला नाही.

मुंबईचा संघ मात्र पहिल्या सामन्यात पराभूत झाला होता. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबईवर मात केली होती. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियन सलामीवीर क्रिस लिनने ४९ धावांची खेळी केली होती. मात्र, केकेआरविरुद्धच्या सामन्यासाठी त्याला संघातून वगळण्यात आले असून दक्षिण आफ्रिकन यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकचे संघात पुनरागमन झाले आहे.

- Advertisement -

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -