Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : जीतबो रे! गोलंदाजांचा भेदक मारा, KKR ची पंजाबवर मात 

IPL 2021 : जीतबो रे! गोलंदाजांचा भेदक मारा, KKR ची पंजाबवर मात 

कोलकाताच्या प्रसिध कृष्णाने तीन, तर पॅट कमिन्स आणि नरीन यांनी २-२ विकेट घेतल्या.

Related Story

- Advertisement -

गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) सामन्यात पंजाब किंग्सवर ५ विकेट राखून मात केली. हा कोलकाताचा यंदा सहा सामन्यांत केवळ दुसरा विजय ठरला. या सामन्यात कोलकाताच्या गोलंदाजांनी पंजाबला केवळ १२३ धावांवर रोखले. याचा पाठलाग करताना नितीश राणा (०) आणि शुभमन गिल (९) हे कोलकाताचे सलामीवीर झटपट माघारी परतले. तसेच सुनील नरीन खातेही न उघडता बाद झाला. मात्र, कर्णधार मॉर्गन (नाबाद ४७) आणि राहुल त्रिपाठी (४१) यांनी ६६ धावांची भागीदारी रचत कोलकाताचा डाव सावरला. त्रिपाठी बाद झाल्यावर मॉर्गनने आंद्रे रसेल (१०) आणि दिनेश कार्तिक (नाबाद १२) यांच्यासोबत उर्वरित धावा करून कोलकाताला विजय मिळवून दिला. कोलकाताने १२४ धावांचे लक्ष्य ५ विकेट आणि २० चेंडू राखून गाठले.

प्रसिध कृष्णाच्या तीन विकेट

त्याआधी या सामन्यात कोलकाताचा कर्णधार मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पंजाबला २० षटकांत ९ बाद १२३ धावाच करता आल्या. मयांक अगरवाल (३१) आणि क्रिस जॉर्डन (३०) यांनी काही चांगले फटके मारले. मात्र, त्यांना इतरांची फारशी साथ लाभली नाही. कोलकाताच्या प्रसिध कृष्णाने तीन, तर पॅट कमिन्स आणि नरीन यांनी २-२ विकेट घेतल्या.

- Advertisement -