घरक्रीडाIPL 2021 : वृद्धिमान साहा पुन्हा पॉझिटिव्ह, माईक हसी अखेर कोरोनामुक्त

IPL 2021 : वृद्धिमान साहा पुन्हा पॉझिटिव्ह, माईक हसी अखेर कोरोनामुक्त

Subscribe

हसी आता कोरोनामुक्त झाल्याने तो रविवारी मायदेशी परण्यातची दाट शक्यता आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी अखेर कोरोनमुक्त झाला असून त्याचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनाने आयपीएलच्या बायो-बबलमध्ये शिरकाव केल्यानंतर हसीला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्याला एअर अ‍ॅम्ब्युलन्सने चेन्नईत नेण्यात आले आणि तिथे त्याचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. परंतु, पुन्हा त्याला कोरोनाची बाधा झाली होती. आता तो कोरोनामुक्त झाला असून त्याची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याचे चेन्नई संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी सांगितले. भारत आणि सनरायजर्स हैदराबादचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाचा कोरोना रिपोर्ट मात्र दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आला आहे.

चुकीची माहिती पसरवणे थांबवा

‘माझा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेला नाही. नियमित तपासणीचा भाग म्हणून माझी दोनदा कोरोना चाचणी झाली. यापैकी एका चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह, तर दुसऱ्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मात्र, माझ्या प्रकृतीत खूप सुधारणा आहे. त्यामुळे माझ्याविषयी चुकीची माहिती पसरवणे थांबवा अशी मी सर्वांना विनंती करतो,’ असे साहाने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले. साहाची कोरोना चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने तो क्वारंटाईनच राहणार आहे.

- Advertisement -

हसी रविवारी मायदेशी परतणार? 

साहाची आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ २५ मे रोजी मुंबईत बायो-बबलमध्ये दाखल होणार असून त्याआधी कोरोनामुक्त होण्याची साहाला आशा आहे. साहा आणि हसी या दोघांचाही दोनदा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हसी आता कोरोनामुक्त झाल्याने तो रविवारी मायदेशी परण्यातची दाट शक्यता आहे. १६ जूनपासून ऑस्ट्रेलियात भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांना पुन्हा प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -