घरक्रीडाIPL 2021 : हैदराबादला पुन्हा जिंकण्यात अपयश; मुंबईचा सलग दुसरा विजय   

IPL 2021 : हैदराबादला पुन्हा जिंकण्यात अपयश; मुंबईचा सलग दुसरा विजय   

Subscribe

मुंबईकडून बोल्ट आणि चहरने ३-३ विकेट घेतल्या.

राहुल चहर आणि ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्यामुळे मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर १३ धावांनी मात केली. मुंबईचा हा सलग दुसरा विजय ठरला. हैदराबादची विजयाची पाटी मात्र कोरीच राहिली. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५० अशी धावसंख्या उभारली होती. याचा पाठलाग करताना हैदराबादची चांगली सुरुवात झाली. जॉनी बेअरस्टो (४३) आणि कर्णधार डेविड वॉर्नर (३६) या सलामीवीरांनी ७.२ षटकांत ६७ धावांची भागीदारी रचली. मात्र, कृणाल पांड्याने बेअरस्टोला बाद करत ही जोडी फोडली. बेअरस्टो हिट विकेट झाला. तर वॉर्नरला हार्दिक पांड्याने धावचीत केले. यानंतर हैदराबादचा डाव गडगडला. बिनबाद ६७ वरून हैदराबादचा डाव १३७ धावांत आटोपला. मुंबईकडून बोल्ट आणि चहरने ३-३ विकेट घेतल्या.

पोलार्डची अखेरच्या षटकांत फटकेबाजी

त्याआधी या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मुंबईचे सलामीवीर रोहित (३२) आणि क्विंटन डी कॉक (४०) यांनी ५५ धावांची भागीदारी रचली. यानंतर विजय शंकरने रोहित आणि सूर्यकुमार यादव (१०) यांना झटपट बाद केले. ईशान किशन (१२) आणि हार्दिक (७) हेसुद्धा फार काळ खेळपट्टीवर टिकले नाहीत. मात्र, पोलार्डने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत २२ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या. त्यामुळेमुंबईने ५ बाद १५० अशी धावसंख्या उभारली.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -