Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा एक नारल दिलाय... या गाण्यावर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी धरला ठेका! पाहा व्हिडिओ

एक नारल दिलाय… या गाण्यावर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी धरला ठेका! पाहा व्हिडिओ

मुंबईचे खेळाडू चाहत्यांचे मनोरंजन करण्यात कधीही कमी पडत नाहीत.

Related Story

- Advertisement -

आयपीएल यंदाच्या मोसमाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार असून गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पुन्हा ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे. मात्र, मुंबईच्या खेळाडूंवर या गोष्टीचा फारसा ताण दिसत नाही. मुंबईच्या संघात कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक आणि कृणाल हे पांड्या बंधू यांसारख्या खेळाडूंचा समावेश असून हे खेळाडू चाहत्यांचे मनोरंजन करण्यात कधीही कमी पडत नाहीत. मुंबईच्या खेळाडूंनी नुकतेच विविध जाहिरातींचे शूट केले. त्यादरम्यान त्यांना जेव्हा वेळ मिळाला, तेव्हा ते ‘एक नारल दिलाय दर्या देवाला’ या लोकप्रिय मराठी गाण्यावर डान्स करताना दिसले. मुंबई इंडियन्सने त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर टाकलेल्या या व्हिडिओच्या सुरुवातीला रोहितने ठेका धरला. त्यापाठोपाठ सूर्यकुमार यादव, बुमराह आणि पांड्या बंधूही डान्स करताना दिसले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

- Advertisement -

मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी मागील वर्षी दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. या सामन्यात रोहितने ६८ धावांची खेळी करत मुंबईच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. यंदा मुंबईचा संघ जेतेपदाचा षटकार मारण्यासाठी उत्सुक आहे. यंदाच्या मोसमात सलामीच्या सामन्यात मुंबईसमोर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान असणार आहे.

- Advertisement -