Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 MI vs RR : ईशान किशन संघातून आऊट; मुंबईची गोलंदाजी 

IPL 2021 MI vs RR : ईशान किशन संघातून आऊट; मुंबईची गोलंदाजी 

मुंबईच्या संघात कुल्टर-नाईल, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्ट असे चार परदेशी खेळाडू आहेत. 

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) आज दुपारच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सपुढे राजस्थान रॉयल्सचे आव्हान आहे. दिल्लीच्या फिरोझ शहा कोटला मैदानावर होत असलेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईला यंदाच्या मोसमात आपला सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आले आहे. त्यांनी यंदा पाच पैकी केवळ दोन सामने जिंकले आहेत. मागील सामन्यात त्यांना पंजाब किंग्सने पराभूत केले होते. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी मुंबईने संघात एक बदल केला आहे. डावखुरा फलंदाज ईशान किशनला वगळून मुंबईने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज नेथन कुल्टर-नाईलला संधी दिली आहे. त्यामुळे मुंबईच्या संघात कुल्टर-नाईल, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्ट असे चार परदेशी खेळाडू आहेत.

मुंबईकर यशस्वी जैस्वाल सलामीला 

दुसरीकडे राजस्थानने आपल्या मागील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर मात केली होती. त्यामुळे त्यांनी संघात बदल करणे टाळले आहे. मुंबईकर यशस्वी जैस्वाल हा जॉस बटलरच्या साथीने राजस्थानच्या डावाची सुरुवात करेल. तसेच राजस्थानच्या संघात बटलर, डेविड मिलर, क्रिस मॉरिस आणि मुस्ताफिझूर रहमान असे चार परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

- Advertisement -

- Advertisement -