घरक्रीडाIPL 2021 : 'या' कारणाने यंदाचा मोसम होईल चुरशीचा - लक्ष्मण

IPL 2021 : ‘या’ कारणाने यंदाचा मोसम होईल चुरशीचा – लक्ष्मण

Subscribe

यंदाचा मोसम नेहमीपेक्षा थोडा वेगळा आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या १४ व्या मोसमाला आजपासून सुरुवात झाली. यंदाचा मोसम नेहमीपेक्षा थोडा वेगळा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, आयपीएल स्पर्धेचे सामने हे रिकाम्या स्टेडियममध्ये म्हणजेच प्रेक्षकांविना होत आहेत. तसेच कोणत्याही संघाला आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळण्याची संधी मिळणार नाही. मात्र, सामने त्रयस्थ ठिकाणी (Neutral Venue) असल्याने यंदाची आयपीएल स्पर्धा अधिकच चुरशीची होईल, असे भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सनरायजर्स हैदराबादचा मार्गदर्शक व्ही. व्ही. एस लक्ष्मणला वाटते.

सुरुवातीला चांगला खेळ महत्वाचा

यंदाच्या आयपीएल मोसमात नक्की कोणता संघ विजेता ठरणार, हे सांगणे अवघड वाटत आहे. आठही संघ संतुलित आहेत. त्यामुळे पुढील आठ आठवडे चाहत्यांना या स्पर्धेचा थरार पाहताना खूप मजा येईल यात शंका नाही. आयपीएलच्या इतिहासावर नजर टाकल्यास आपल्याला जाणवते की, स्पर्धेच्या सुरुवातीला चांगला खेळ करून सामने जिंकणे महत्वाचे आहे. मात्र, काही संघांनी अखेरच्या सामन्यांत मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावून स्पर्धा जिंकल्याचीही उदाहरणे आहेत, असे लक्ष्मण म्हणाला.

- Advertisement -

कोणत्याही संघाचे पारडे जड नाही

मागील वर्षी कोरोनाच्या धोक्यामुळे आयपीएल स्पर्धा युएईमध्ये झाली. यंदा ही स्पर्धा भारतात परतली असली तरी कोणत्याही संघाचे पारडे जड नाही. कोणत्याही संघाला आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळायला मिळणार नाहीत. त्रयस्थ ठिकाणी सामने होणार असल्याने कोणताही संघ कोणत्याही संघाला पराभूत करू शकेल. त्यामुळे यंदाची स्पर्धा अधिकच चुरशीची होईल, असेही लक्ष्मणने नमूद केले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -