Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Video: पंतने स्टंपमागून दिला अक्षर पटेलला सल्ला अन् पुढच्या चेंडूवर कार्तिक आऊट

Video: पंतने स्टंपमागून दिला अक्षर पटेलला सल्ला अन् पुढच्या चेंडूवर कार्तिक आऊट

Related Story

- Advertisement -

आयपीएलच्या १४ व्या मोसमात गुरुवारी दिल्ली कॅपिटल आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. फॉर्ममध्ये असलेल्या पृथ्वी शॉच्या ४१ चेंडूत ८२ धावांच्या मदतीने दिल्ली कॅपिटलने कोलकाता नाईट रायडर्सचा ७ गडी राखून पराभव केला. या सामन्यात दिनेश कार्तिकला बाद करण्यासाठी रिषभ पंतने जी युक्ती वापरली त्याची चर्चा जोरदार आहे. स्टंपमागून पंतने अक्षर पटेलला असा काही सल्ला दिला की पुढच्याच चेंडूवर विकेट मिळाली. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

KKR ने १६ षटकांत ५ गडी गमावत १०५ धावा केल्या होत्या. दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल क्रीजवर उपस्थित होते. रिषभ पंतने अक्षर पटेलला १७ वं षटक टाकायला दिलं. दिनेश कार्तिकने पहिला बॉल स्वीप्ट मारला आणि एक चौकार लगावला. यानंतर रिषभ पंत मागून ओरडला – ‘थोड़ा दूर ले जा, यह तो पहले ही स्वीप मारने के लिए बैठे हुए हैं.’ पुढच्याच चेंडूवर अक्षर पटेलने कार्तिक एलबीडब्ल्यूला बाद केलं.

- Advertisement -

KKR ने विजयासाठी विजयासाठी दिलेल्या १५५ धावांचं उद्दिष्ट दिल्लीने तीन विकेट गमावत २१ चेंडू बाकी ठेवत सामना जिंकला. पृथ्वी शॉने ४१ चेंडूंमध्ये ११ चौकार व तीन षटकारांच्या मदतीने ८२ धावा फटकावल्या. शिखर धवनबरोबर पहिल्या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी करुन त्याने दिल्लीचा विजय निश्चित केला.

- Advertisement -

 

- Advertisement -