Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : पृथ्वी शॉने केली KKR च्या गोलंदाजांची धुलाई; दिल्ली ७...

IPL 2021 : पृथ्वी शॉने केली KKR च्या गोलंदाजांची धुलाई; दिल्ली ७ विकेट राखून विजयी 

पृथ्वीने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावले.

Related Story

- Advertisement -

पृथ्वी शॉने कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. पृथ्वीने ४१ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने केलेल्या ८२ धावांच्या खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाताचा ७ विकेट राखून पराभव केला. हा दिल्लीचा सात सामन्यांत पाचवा विजय ठरला. या सामन्यात कोलकाताने दिल्लीपुढे विजयासाठी १५५ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना पृथ्वीने सुरुवातीपासूनच आक्रमक शैलीत फलंदाजी केली. त्याने शिवम मावीने टाकलेल्या डावाच्या पहिल्याच षटकात सहा चौकार मारले. त्याने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याला सलामीचा साथीदार शिखर धवनची (४६) चांगली साथ लाभली. अखेर या दोघांना, तसेच कर्णधार रिषभ पंतला (१६) पॅट कमिन्सने बाद केले. परंतु, दिल्लीने २१ चेंडू शिल्लक असतानाच हा सामना जिंकला.

रसेलच्या नाबाद ४५ धावा

त्याआधी या सामन्यात दिल्लीचा कर्णधार पंतने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली होती. कोलकाताने २० षटकांत ६ बाद १५४ अशी धावसंख्या उभारली. सलामीवीर शुभमन गिलने संयमाने फलंदाजी करताना ३८ चेंडूत ४३ धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त आघाडीच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले. परंतु, अखेरच्या षटकांत आंद्रे रसेलने २७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ४५ धावा केल्याने कोलकाताला १५० धावांचा टप्पा पार करण्यात यश आले.

- Advertisement -