घरक्रीडाIPL 2021 : उर्वरित मोसमासाठी 'हा' ऑस्ट्रेलियन गोलंदाज पंजाब किंग्सच्या ताफ्यात

IPL 2021 : उर्वरित मोसमासाठी ‘हा’ ऑस्ट्रेलियन गोलंदाज पंजाब किंग्सच्या ताफ्यात

Subscribe

आयपीएलचा उर्वरित मोसम १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत युएई येथे खेळला जाणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. परंतु, आता आयपीएलचा उर्वरित मोसम १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत युएई येथे खेळला जाणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी बरेचसे खेळाडू युएईमध्ये दाखलही झाले आहेत. परंतु, पंजाब किंग्सचे रायली मेरेडीच आणि जाय रिचर्डसन हे ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज उर्वरित आयपीएलला मुकणार आहेत. त्यामुळे पंजाब किंग्सने ऑस्ट्रेलियाच्याच नेथन एलिसची बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे. तसेच आणखी एका बदली खेळाडूची लवकरच घोषणा करणार असल्याचेही सांगण्यात आले.

पदार्पणात हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज

पंजाब किंग्सने नव्या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या नेथन एलिसचा संघात समावेश केला आहे. वेगवान गोलंदाज एलिस आयपीएलच्या उर्वरित मोसमात पंजाब संघाचा भाग असेल. क्वारंटाईनचा कालावधी संपताच तो पंजाब संघात दाखल होईल, असे पत्रकात म्हटले होते. एलिससाठी मागील काही दिवस अविस्मरणीय ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणात हॅटट्रिक घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला होता. त्याने बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सामन्यात ३४ धावांत तीन विकेट घेतल्या.

- Advertisement -

बिग बॅश लीगमध्ये दमदार कामगिरी 

आयपीएलच्या उर्वरित मोसमाची सांगता झाल्यानंतर दोन दिवसांत टी-२० वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. युएईमध्येच होणाऱ्या या स्पर्धेसाठी एलिसची राखीव खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियन संघात निवड झाली आहे. एलिसने बिग बॅश लीगच्या मागील मोसमात दमदार कामगिरी केली होती. त्याने होबार्ट हरिकेन्सकडून खेळताना १४ सामन्यांत २० विकेट घेतल्या होत्या. याच कामगिरीच्या जोरावर त्याची ऑस्ट्रेलियन संघात निवड झाली होती.


हेही वाचा – अफगाणिस्तान क्रिकेट संघाची काबुलमध्ये पुन्हा सरावाला सुरुवात

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -