घरक्रीडाIPL 2021 : कर्णधार सॅमसनचे पदार्पण; आज राजस्थान-पंजाब आमनेसामने

IPL 2021 : कर्णधार सॅमसनचे पदार्पण; आज राजस्थान-पंजाब आमनेसामने

Subscribe

संजू सॅमसनसाठी हा सामना खास असेल.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) आज राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब हे संघ आमनेसामने येणार आहेत. यंदाच्या मोसमातील हा दोन्ही संघांचा पहिलाच सामना असणार आहे. संजू सॅमसनसाठी हा सामना खास असेल. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून सॅमसन या सामन्यात पदार्पण करेल. राजस्थानच्या संघाला मागील मोसमात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यांनी १४ पैकी केवळ ६ सामने जिंकले होते. तसेच सर्वात खराब नेट-रनरेटमुळे हा संघ गुणतक्त्यात तळाला राहिला होता. त्यामुळे यंदाच्या मोसमाआधी राजस्थानने संघात काही बदल केले. मागील वर्षी स्टिव्ह स्मिथने राजस्थानचे नेतृत्व केले होते. यंदा मात्र त्याला संघाबाहेर करण्यात आले असून सॅमसन आता नेतृत्वाची धुरा सांभाळेल.

राहुल, गेलवर पंजाब अवलंबून  

दुसरीकडे पंजाबचा यंदा वेगळ्या नावाने ओळखला जाईल. या संघाला आता पंजाब किंग्स असे नाव देण्यात आले असून या संघाच्या लोगोमध्ये आणि जर्सीमध्येही बदल करण्यात आला आहे. आता बदलांचा संघाला फायदा होईल, अशी कर्णधार लोकेश राहुलला आशा आहे. पंजाबचा संघ फलंदाजीत कर्णधार राहुल, मयांक अगरवाल, क्रिस गेल आणि निकोलस पूरन यांच्यावर अवलंबून आहे. तसेच गोलंदाजीत मोहम्मद शमी, रवी बिष्णोई, जाय रिचर्डसन आणि रायली मेरेडीच यांचे चांगल्या कामगिरीचे लक्ष्य असले.

- Advertisement -

मॉरिसकडून मोठ्या अपेक्षा

राजस्थानच्या संघात कर्णधार सॅमसन, जॉस बटलर, बेन स्टोक्स आणि राहुल तेवातिया यांसारखे खेळाडू असून ते या सामन्यात कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. तसेच क्रिस मॉरिसला राजस्थानने मोठ्या किंमतीत खरेदी केल्याने त्याच्याकडूनही संघाला मोठ्या अपेक्षा आहेत.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -