Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : पंजाब किंग्सच्या जर्सीचा नवा लूक पाहिलात? 'हे' आहेत बदल

IPL 2021 : पंजाब किंग्सच्या जर्सीचा नवा लूक पाहिलात? ‘हे’ आहेत बदल

पंजाबचा संघ नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल.

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आगामी मोसमाबाबत सध्या बरीच चर्चा आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. आठही संघांनी या स्पर्धेच्या दृष्टीने तयारीला सुरुवात केली आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या बलाढ्य संघांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या नव्या जर्सीचे अनावरणही केले. त्यापाठोपाठ आता मंगळवारी पंजाब किंग्स संघानेही आपल्या नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. पंजाबने त्यांच्या जर्सीचा प्रमुख रंग लालच ठेवला आहे. मात्र, या जर्सीवरील रेषा आणि इतर डिझाईनच्या रंगात बदल करण्यात आला आहे. मागील वर्षीपर्यंत जर्सीवरील डिझाईनला सिल्वर रंग होता. मात्र, आता हे डिझाईन गोल्डन रंगाचे असणार आहे.

हेल्मेटच्या रंगातही बदल

- Advertisement -

जर्सीप्रमाणेच पंजाब किंग्स संघाने त्यांच्या हेल्मेटच्या रंगातही बदल केला आहे. पूर्वी पंजाबचे खेळाडू लाल रंगाचे हेल्मेट घालत होते. यंदा मात्र हेल्मेटला गोल्डन रंग देण्यात आला आहे. पंजाबला आयपीएलच्या मागील मोसमात चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्यांनी आता आपल्या संघाचे नाव बदलले आहे. या संघाचे किंग्स इलेव्हन पंजाब असे नाव होते. मात्र, आता हा संघ पंजाब किंग्स या नावाने ओळखला जाईल.

punjab kings
पंजाब किंग्स

सलामीची लढत राजस्थानसोबत

- Advertisement -

पंजाबचा संघ यंदा नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल. यंदाच्या आयपीएलला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार असून पंजाबचा संघ आपला पहिला सामना १२ एप्रिलला खेळेल. त्यांची सलामीची लढत संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्स संघासोबत होईल. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

- Advertisement -