घरक्रीडाIPL 2021 MI vs RR : राजधानीत मुंबईचा बोलबाला; डी कॉक ठरला...

IPL 2021 MI vs RR : राजधानीत मुंबईचा बोलबाला; डी कॉक ठरला मॅचविनर 

Subscribe

डी कॉकने ५० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ७० धावांची खेळी केली.

क्विंटन डी कॉकने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ७ विकेट राखून मात केली. हा मुंबईचा यंदा सहा सामन्यांत तिसरा विजय ठरला. दिल्लीच्या फिरोझ शहा कोटला मैदानावर झालेल्या या सामन्यात राजस्थानने मुंबईपुढे १७२ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना मुंबईचे सलामीवीर डी कॉक आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी सहा षटकांत ४९ धावांची सलामी दिली. मात्र, रोहित (१४) आणि सूर्यकुमार यादव (१६) यांना क्रिस मॉरिसने झटपट बाद करत मुंबईला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, डी कॉकने अप्रतिम फलंदाजी सुरु ठेवली. त्याला कृणाल पांड्या (३९) आणि पोलार्ड (नाबाद १६) यांची उत्तम साथ लाभल्याने मुंबईने हा सामना जिंकला. डी कॉकने ५० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ७० धावांची खेळी केली.

- Advertisement -

कर्णधार सॅमसनची फटकेबाजी 

त्याआधी या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. राजस्थानचे सलामीवीर जॉस बटलर (४१) आणि यशस्वी जैस्वाल (३२) यांनी सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली. परंतु, या दोघांना लेगस्पिनर राहुल चहरने माघारी पाठवले. यानंतर कर्णधार संजू सॅमसनने (४२) फटकेबाजी केली. त्याला शिवम दुबेची (३५) साथ लाभल्याने राजस्थानने २० षटकांत ४ बाद १७१ अशी धावसंख्या केली होती.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -