Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : कौतुकास्पद! राजस्थान रॉयल्सकडून कोरोनाग्रस्तांना ७.५ कोटींची मदत

IPL 2021 : कौतुकास्पद! राजस्थान रॉयल्सकडून कोरोनाग्रस्तांना ७.५ कोटींची मदत

राजस्थान रॉयल्सने कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या लोकांसाठी मदत जाहीर केली आहे.

Related Story

- Advertisement -

भारतात सध्या कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. देशात बुधवारी ३ लाख ७९ हजार २५७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे सरकार चिंतेत असून आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. मात्र, त्यांना देशभरातून मदतीचा हात दिला जात असून आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सनेही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान संघाने आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोनाग्रस्तांना ७.५ कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली.

खेळाडू, संघमालक यांचा पुढाकार

राजस्थान रॉयल्सने कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या लोकांसाठी ७.५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. राजस्थानचे खेळाडू, संघमालक आणि संघ व्यवस्थापन यांच्यासह राजस्थान रॉयल्स फाऊंडेशनने ब्रिटिश एशियन ट्रस्टसोबत मिळून पुढाकार घेत हा निधी गोळा केला आहे. ब्रिटिश एशियन ट्रस्ट ही भारत सरकारसोबत विविध प्रकल्पात काम करत आहेत, असे राजस्थान संघाकडून सांगण्यात आले.

क्रिकेटपटूंकडून मदतीचा हात

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सचा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने भारतातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी ५० हजार डॉलर म्हणजेच ३७ लाख ३६ हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिले होते. तसेच ब्रेट लीने भारतात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी क्रिप्टो रिलीफला एक बिटकॉइन म्हणजेच सुमारे ४२ लाख रुपयांची देणगी दिली आहे.

- Advertisement -