घरक्रीडाIPL 2021 : राजस्थान रॉयल्सला धक्का! 'हा' खेळाडू सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार 

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला धक्का! ‘हा’ खेळाडू सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार 

Subscribe

यंदाच्या मोसमाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्याआधी काही दिवस राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानचा इंग्लिश वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर कोपराला झालेल्या दुखापतीमुळे यंदाच्या मोसमातील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. तसेच तो मंगळवारपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही खेळू शकणार नाही. आर्चर हा इंग्लंड आणि राजस्थान रॉयल्स संघाचा प्रमुख गोलंदाज मानला जातो. युएई येथे झालेल्या आयपीएलच्या मागील मोसमात त्याने १४ सामन्यांत २० विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे त्याची उणीव राजस्थानला नक्कीच भासेल.

कोपराला झालेली दुखापत गंभीर

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका नुकतीच पार पडली. आर्चरने या मालिकेच्या पाच सामन्यांत आठ विकेट घेतल्या. या मालिकेदरम्यान आर्चरच्या कोपराला झालेली दुखापत अधिकच गंभीर झाली. याबाबत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने सांगितले, टी-२० मालिकेदरम्यान आर्चरच्या कोपराला झालेली दुखापत अधिकच गंभीर झाली. त्यामुळे त्याला चांगली कामगिरी करत राहणे अवघड झाले होते. एकदिवसीय मालिकेसाठी तो पूर्णपणे फिट नसल्याचे निष्पन्न आम्ही काढले आहे. या दुखापतीमुळे तो आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामान्यांनाही मुकेल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -