घरक्रीडाIPL 2021 : KKR विरुद्ध राजस्थानची गोलंदाजी; मुंबईकर यशस्वी जैस्वालला संधी 

IPL 2021 : KKR विरुद्ध राजस्थानची गोलंदाजी; मुंबईकर यशस्वी जैस्वालला संधी 

Subscribe

राजस्थानने संघात दोन बदल केले आहेत.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये सामना होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. राजस्थान आणि कोलकाता या दोन्ही संघांना अजून चार पैकी केवळ एक सामना जिंकता आलेला असून ते विजयाच्या शोधात आहेत. या सामन्यासाठी राजस्थानने संघात दोन बदल केले आहेत. सलामीवीर मनन वोहरा आणि लेगस्पिनर श्रेयस गोपाळला संघातून वगळण्यात आले असून मुंबईकर सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट यांना संधी देण्यात आली आहे. यशस्वीचा हा यंदा पहिलाच सामना आहे.

शिवम मावी संघात

दुसरीकडे कोलकाताने संघात एक बदल केला आहे. कमलेश नागरकोटीच्या जागी शिवम मावीची संघात निवड झाली आहे. कोलकाताच्या संघात कर्णधार मॉर्गन, सुनील नरीन, आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्स असे चार परदेशी खेळाडू आहेत. मुंबईमध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळत असली तरी कोलकाताने नरीन आणि वरुण चक्रवर्ती या दोन फिरकीपटूंना संघात स्थान दिले आहे.

- Advertisement -

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -